सवना सोसायटीच्या चेयरमनपदी सतत पाचव्यांदा गोपतवाड यांची बिनविरोध निवड -NNL


हिमायतनगर|
तालुक्‍यातील चळवळीचे गाव म्हणुन प्रसिध्द असलेल्या सवना ज येथील सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन, उपचेअरमन पदाची निवड २ सप्टेंबर राजी खेळीमेळीच्या वातावरणात तालुका सहायक निबंधक लक्ष्मणराव डवरे यांच्या उपस्थितीत सपंन्न झाली. चेअरमनपदी सतत पाचव्यांदा परमेश्वर गोपतवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपचेअरमन पदी दिलीप धावजी आडे यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे. सतत पाचवेळा चेअरमन होणारे परमेश्‍वर गोपतवाड हे तालुक्‍यात पहिले चेअरमन आहेत.

२ सप्टेंबर रोजी तालुका सहाय्यक निबंधक लक्ष्मणराव डवरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक निर्वाचन अधिकारी पद्‌मावार, सहाय्यक निवडणुक निर्वाचन अधिकारी नंदकिशोर अलकटवार यांच्या उपस्थित सवना (ज) येथे चेअरमन, उपचेअरमन यांची निवड झाली. चेअरमन पदासाठी संचालक दिलीपराव अनगुलवार यांनी परमेश्‍वर गोपतवाड यांनी नाव सुचविले. तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक, माजी ग्रा.प. सदस्य, जेष्ठ संचालक माधवराव बिरकलवार यांनी अनुमोदन दिल्यांनतर उपस्थित संचालकांनी टाळ्याच्या गजरात पाठिंबा दिल्यामुळे चेअरमन पदाची बिनविरोध निवड झाली आहे. उपचेअरमन पदासाठी दिलीप धावजी आडे यांची विजय जाधव यांनी सुचविले तर जेष्ट संचालक गणेशराव भुसाळे यांनी अनुमोदन दिल्यामुळे आडे यांचीही उपचेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्वाचन अधिकारी पद्‌मावार यांनी जाहिर केले. 

यावेळी संचालक दिलीपराव अनगुलवार, माधवराव बिरकलवार, गणपत राउत, प्रेमसिंग जाधव, गणेशराव भुसाळे, विजय जाधव, सौ गंगाबाई नामदेव जाधव, सौ. कलावतीबाई लक्ष्मण अनगुलवार यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचीत संचालकांचे स्वागत देवराव पाटील गोपेवाड, राजीवभाउ अनगुलवार, सेवानिवृत पोलीस पाटील गणपतराव गोपतवाड, तंटामुक्‍त गाव समितीचे अध्यक्ष कैलास अनगुलवार, गुणाजी आडे, उपसरपंच प्रतिनिधी सोनबा राउत, सिध्दार्थ राऊत, भारत गटकपवाड, ग्रा प सदस्य संदिप बिरकलवार, सतोष संभाजी अनगुलवार, नंदकिशोर राउत, मारोतराव पाटील आक्कलवाड, बंडुभाउ अनगुलवार, संजय राउत, लक्ष्मण गायकवाड, प्रकाश अनगुलवार, विनायक शिदे पाटील, पंजाबराव भुसाळे, शंभुराज गोपेवाड, सोनबा अनगुलवार, दत्ताभाउ काळे, परमेश्वर संगनवाड, सुनिल गुंडेकर,,रोहन जाधव,संतोष पाटील कल्याणे, राजीव आडे, सुभाष आडे, बालाजी भुसाळे,  बुध्देवाड, बजरंग आलेवाड, बुटनवाड पाटील, साहेबराव बिरकलवार, विजय राउत, यलसटवार सावकार,शिवाजी बिल्लेवाड, राहुलवाड, बाळाभाउ विठलवाड, मुरली अनगुलवार, बाबुराव ढाले, रतन पाटील वानखडे, राजीव जाधव, बाबाराव आक्कलवाड, पुठेवाड, दिगंबर अनगुलवार, संकष्टवार, अनिल आहिरवाड, शिवा जोन्नापल्ले, लक्षटवार, भगवान कराळे, परमेश्‍वर गुजेवाड, सयाजी आलेवाड यांच्यासह सभासद शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी