धनंजय सलगरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवा उमरी तालुका उपाध्यक्ष पदी निवड -NNL


उमरी/नांदेड।
तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवड,सभासद नोंदणी अभियान नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला.

यावेळी,धनंजय सलगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर उमरी राष्ट्रवादी महिला तालुका अधक्ष्यपदी वाघालवाडा नगरीचे सतत दहा वर्ष सरपंच पद यशस्वी रित्या पार पाडलेले सौ.अश्विनीताई प्रवीण पाटील सावंत वाघालवाडेकर यांच्यासह अनेक जणांचे उपाध्यक्ष सचिव सरचिटणीस सदस्यांची

नायगाव विधानसभेचे युवा नेते मा.सभापती प.स.उमरी शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर,युवा नेते कैलासभाऊ देशुमख गोरठेकर, भाऊसाहेब देशमुख गोरठेकर,सुभाष देशमुख गोरठेकर,डॉ.विक्रम देशमुख तळेगावकर,जिल्हाउपाध्यक्ष पांडुरंग देशमुख गोरठेकर यांच्या उपस्थितीत निवड पत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावनगावकर,शिरीषभाऊ गोरठेकर,डॉ.विक्रम देशमुख तळेगावकर यांची भाषणे झाली.

यावेळी,जि.प.सदस्य आनंदराव यलमगोंडे,दत्तराम पाटील मुंगल, शिवाजी पाटील चिंचाळकर, चंदेल साहेब सोमठाणकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम शेलगावकर,ओबीसी तालुकाध्यक्ष गणेश अन्नमवाड, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष हणमंत पाटील कुदळे कर,अविनाश पाटील पवळे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गोदावरी शिक्षण संस्था तळेगाव कै. गिरिष देशमुख गोरठेकर इंग्लिश स्कुल येथील सर्व शिक्षक वर्ग पत्रकार बांधव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी