‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठच्या वर्धापन दिनानिमित्ताने आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांच्या स्पर्धेचा निकाल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दि. १७ सप्टेंबर रोजी जाहीर केला. यामध्ये प्रसाद शिंदे आणि प्रविण देशमुख यांच्या छायाचित्रास उपलब्ध चायाचीत्रापैकी उत्कृष्ट छायाचित्र म्हणून परीक्षकातर्फे जाहीर करण्यात आले. 

विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुल व जनसंपर्क विभागाच्या संयुक्त विद्यमाने हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘सांस्कृतिक व ऐतिहासिक मराठवाडा’ तसेच हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी संबंधित स्थळे या विषयावर छायाचित्रे मागवण्यात आली होती. स्पर्धेसाठी प्राप्त छायाचित्रणांचे सुप्रसिद्ध छायाचित्रकार डॉ. अनिल साखरे आणि सुरेश जोंधळे यांनी परीक्षण केले व आपला अहवाल सादर केला.  

स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या एकूण प्रवेशिकांमधून ‘आजादी का अमृत महोत्सव’ (प्रसाद शिंदे), विजयस्तंभ चारठाणा (प्रविण देशमुख) आणि कंधारचा किल्ला (प्रसाद शिंदे) या तिन छायाचित्रांसाठी उत्तेजनार्थ म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले आहे.  

रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये या पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे. असे ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी कळवले आहे.  

या स्पर्धेत भाग घेतलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन दि. १७ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रामध्ये आयोजित करण्यात आले. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. रसिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट दिली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी