माहुर तालुक्याच्या जूनापानी गांवचे भूमिपुत्र छगन धर्मा जाधव यांची जमादार म्हणून पदोन्नती -NNL


नांदेड।
माहुर तालुक्याच्या जूनापानी गांवचे भूमिपुत्र छगन धर्मा जाधव यांची जमादार म्हणून पदोन्नती झाली असून, 1992 मध्ये जहाल नक्सवादी नेता विजयकुमारच्या एन्काउन्टर मध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावनारे छगन जाधव व त्यांचे चार सहकारी यांची पोलिस खात्यात सरळ भर्ती झाली होती.

1992 मध्ये पोलिस कांस्टेबल बनलेल्या छगन जाधव यांना खात्याअंतर्गत बढ़ती मिळाली असून ते आता जमादार झाले आहेत. सध्या ते पोलिस कांस्टेबल म्हणून माहुर पोलिस स्थानकात  कर्तव्य बजावत असून आज त्यांना जमादार पदाची फ़ित माहुर पोलिस स्थानकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक नामदेव रीठे व सहायक पोलिस निरिक्षक  अन्नासाहेब पवार यांनी लावली असून सहायक पोलिस निरिक्षक संजय पवार व पोलिस उपनिरीक्षक घोड़के  व सर्व सहकारी मित्रानी  त्यांच्या यां यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी