मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालचा विकासात्मक कायापालट -NNL


नविन नांदेड।
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या ईमारत सह अंतर्गत भागातील विविध विभागांच्या व परिसरातील अनेक भागाचा कायापालट  मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने व उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ.रईसौधदीन खाजा अहमोधदीन यांनी केलेल्या  पाठपुराव्यामुळे व झोन अंतर्गत कर्मचारी यांनी केलेल्या  सहकार्यामुळे एक महिन्याच्या कालावधीत कायापालट करण्यात आल्यामुळे स्वच्छ व सुंदर इमारत सह रंगरंगोटी मुळे आकर्षक दिसु लागली आहे.

नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय हे २००८ साली बांधण्यात आलेल्या ईमारती मध्ये कार्यरत आहे,या ठिकाणी जवळपास १२ वर्षांचा कालावधी मध्ये ईमारत,परिसर अंतर्गत भाग, फर्निचर, आलमारी, टेबल , साहित्य आदी वस्तू नादुंरुस्त अवस्थेत तर कार्यालय अंतर्गत रंगरंगोटी नसल्याने व विविध भागात असतं व्यस्त पसरलेल्या संचिका व ईतर कार्यालयीन कागदपत्रे हे मोठ्या प्रमाणात होते तर संततधार पावसामुळे परिसरात केरकचरा ईमारातीचा परिसर हा धुळ खात होता,तर प्रवेशद्वार मधुन येणा-या लोखंडी पायरया व फायबर पत्रे गंजलेल्या व तुटलेल्या अवस्थेत होते तर खिडक्याची काचे फुटलेल्या अवस्थेत, तर कार्यालय अधिक्षक ,संगणक कक्ष , नावपरिवतन ,जन्म मृत्यू कक्ष दुरुस्ती अभावी मोडकळीस अवस्थेत होते.

सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने व उपायुक्त स्वच्छता विभागाचे पंजाबराव खानसोळे यांनी दिलेल्या भेटी नंतर ईमारत पाहणी व परिसरात स्वच्छता यासह अंतर्गत भागातील स्वच्छता करण्याचे आदेश दिले,

या क्षेत्रीय कार्यालयास सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयातील दुरुस्ती ,रंगरंगोटी, फर्निचर दुरुस्ती व प्रलंबित कामे अहवाल पाठवला तर स्वच्छता अभियान अंतर्गत कार्यालय अधीक्षक विलास गजभारे यांना जबाबदारी दिल्या नंतर कर निरीक्षक, वसुली लिपीक, कार्यालयीन कर्मचारी यांच्या सह स्वच्छता विभागाचे पुरुष व महिला मजूर यांनी कार्यालय अंतर्गत विभाग व परिसर स्वच्छ केला तर सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन यांनी रंगरंगोटी व लोखंडी पायरया ,खिडक्यांच्यी काच, दरवाजे यासह धुळखात जुन्या झालेल्या अनेक फर्निचर हे तात्काळ बद्दल करण्यात येऊन इमारत रंगरंगोटी व लोखंडी पायरया खिडक्यांच्यी काच दरवाजे आदी दुरुस्ती करून घेण्यात आल्या आहेत.

कार्यालय अधीक्षक ,संगणक,आवक जावक,जन्म मृत्यू कक्ष हे दर्शनी भागात सुसज्ज अवस्थेत करण्यात येणार आहेत यासाठी १२ वर्षांचा कालावधी नंतर सिडको क्षेत्रीय कार्यालय सुसज्ज व स्वच्छ ,सुंदर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त डॉ रईसोधदीन  यांनी केलेल्या सहकार्यामुळे व वेळोवेळी कार्यालय अधीक्षक विलास गजभारे यांच्या वांरवार केलेल्या मनपाच्या वरीष्ठ विभागाचे प्रमुख यांना केलेल्या  पत्रव्यवहार मुळे तात्काळ कायापालट झाला असून कार्यालयीन कर्मचारी  ईमारत निरीक्षक राहुल सोनसळे,कर निरीक्षक  सुधीर बैस,दिपक पाटील,सुदास थोरात, वसुली लिपीक  सुखदेव जोंधळे, मारोती सांरग,मालु एनफळे,राजपाल सिंग जक्रीवाले, संदीप धोंडगे, प्रकाश दर्शने, मारोती चव्हाण, रविंद्र पवळे, संतोष भदरगे, नथुराम चवरे, कर्मचारी बालाजी लोहगावकर,राजरत्न जौधंळे, विना अबडलवार,प्रभु गिराम,प्रशांत चावरे, मुक्ताबाई धरमेकर, मदनसिंग बैस,गिरी रतन, सुधीर कांबळे , नरेंद्र शिंगे,मदन कोल्हे,यांनी केलेल्या सहकार्यामुळे परिसर व अंतर्गत भाग स्वच्छ झाला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी