सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या अध्यक्षपदी सतिश कदम व उपाध्यक्ष दिलीप ठाकूर यांच्यी पुनश्च नियुक्ती -NNLनविन नांदेड| नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या सिडको शाखेच्या  कार्यकारिणी ची निवड करण्यात येऊन पुनश्च अध्यक्षपदी सतिश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर व सचिव बालाजी सुताडे यांच्यी निवड करण्यात आली या निवडी बद्दल अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या महत्वपूर्ण बैठक १३ सप्टेंबर रोजी मार्गदर्शक तथा नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, सल्लागार किरण देशमुख व जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते शेख सयोधदीन, मदनसिंह चव्हाण, दौलतराव कदम व महिला वितरक वंदना लोणे यांच्या सह वृत्तपत्र विक्रेते ऊपसिथीत होते. यावेळी जुन्या कार्यकारिणी नी विविध ऊपकम,व त्यांच्या कार्यकाळात टिन शेड सेटंर यांच्या सह सामाजिक बांधिलकी जोपासत विविध कार्यक्रम व गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

वेळोवेळी वृत्तपत्र विक्रेते व पदाधिकारी यांना आर्थिक मदत,व कमिशन वाढीसाठी केलेले प्रयत्न पाहता या कार्यकारिणी ची पुनश्च निवड करण्यात आली, यावेळी वृत्तपत्र पदाधिकारी यांच्या अडचणी बाबत व विविध समस्याचे निराकरण करण्यात आले,व ऊपसिथीत जेष्ठ विक्रेते यांच्या सह ऊपसिथीत पदाधिकारी, वृत्तपत्र विक्रेते यांनी आहे त्या कार्यकारिणीची पुनश्च निवड करण्याची मागणी करण्यात आल्या नंतर २०२३ वर्षा साठी नियुक्ती करण्यात आली आहे. या पुनश्च नियुक्ती नंतर कार्यकारिणी चे पुष्प हार घालून स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी अनिल धांवडे,तातेराव वाघमारे,साई गोटमवार, यांच्या सह वृत्तपत्र विक्रेते ऊपसिथीत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी