५०० लाेककलावंतानां अनूदान देण्याची आ.माधवराव पाटील जवळगावकर यांची मागणी -NNL

पाेटा येथे लाेककलावंत मेळावा व पुरस्कार वितरण संपन्न


नांदेड/हिमायतनगर।
भौगाेलिक आकार व जिल्ह्याची लाेकसंख्या यावर आधारीत लाेककलावंताना मानधन देण्याचे उद्दिष्ट ठरवून नांदेडसाठी ५०० लाेककलावंताना संधी द्दावी असे प्रतिपादन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. स्मृतिशेष गुरवर्य एम. पी.भवरे कामारीकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्यावतीने १८ सप्टेंबर रविवारी पाेटा ता.हिमायतनगर येथे आयाेजित लाेककलावंत मेळावा आणि आदर्श समाजसेवक, पदाधिकारी, अधिकारी ,शिक्षक, सिनेकलाकार हास्यकलाकार लाेककलावंत यांना पुरस्कार वितरण प्रसंगी केले.  अध्यक्षस्थानी बहुजन टायगर्स फाेर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे हे हाेते.

जिल्ह्याच्या ग्रामीण  भागात  लाेककलेवर दैनंदिनी भागवणारे कलावंत अडचणीचा सामाना करूत असतात त्यांचे प्रश्न साेडविण्यासाठी स्थानिक पदाधिकारी शासनाचे अधिकारी समाजसेवक यांनी प्रयत्न करावे.वंचित लाेककलावंताच्या समस्या साेडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे आमदार माधवराव पाटील म्हणाले.


प्रारंभी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  एस.जी.माळाेदे यांनी लाेककलावंत मेळाव्याचे उद्घाटन केले.जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके यांनी मार्गदर्शन केले. स्वागतपर भाषण बालाजी राठाेड यांनी केले.प्रास्ताविकात अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी लाेककलावंत मेळावे पुरस्कार वितरण सन २००३ सालापासून केले जात असल्याचे सांगितले.आभार लक्ष्मण भवरे यांनी मानले तर संचालन उत्तम कानिंदे यांनी केले. गुरुवर्य एम.पी.भवरे कामारीकर स्मृती  पुरस्कारांचे वितरण आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याहस्ते अभिनेता एस.व्ही रमणा हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे, पत्रकार तथा निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे झाले.


तसेच पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद  स्वियसहाय्यक बालाजी नागमवाड(सेवा गौरव), समाजसेविका श्रीमती विजया काचावार ((सेवा गौरव), विस्तार अधिकारी प.स.लोहा डि आय गायकवाड (सेवा गौरव), समाज कल्याण निरिक्षक श्रीमती एस.जी.वागतकर (सेवा गौरव), जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि.प. मिलिंद व्यवहारे (सेवा गौरव)समतादूत दिलिप सोंडारे(सेवा गौरव) समाज सुधारक कैलास गायकवाड (सेवा गौरव), वनाधिकारी श्रीकांत जाधव (कर्तव्यदक्ष अधिकारी) वनाधिकारी अनिल रासने (कर्तव्यदक्ष अधिकारी),सपोनि बी.जी.महाजन(कर्तव्यदक्ष अधिकारी), वनाधिकारी एस.डी.हराळ(कर्तव्यदक्ष अधिकारी) कृषी अधिकारी पुंडलिक माने(कर्तव्यदक्ष अधिकारी), मुख्याध्यापक सरसम गजानन सुर्यवंशी (आदर्श मुख्याध्यापक), सहशिक्षक समाधान सुर्वे (आदर्श शिक्षक) वनपाल अण्णासाहेब वडजे (सेवा गौरव) सहशिक्षक गोपाल तुमल्लवार (आदर्श शिक्षक), वनपाल अमोल कदम(सेवा गौरव).यांना यावेळी गौरविण्यात आले.

या मेळाव्याचे निमंत्रक कैलास माने,दताभाऊ पवार तर स्वागताध्यक्ष रफिक भाई शेख हिमायतनगर कर ,जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, साहित्यिक डॉ,मारोती वाघमारे,पत्रकार कानबा पोपलवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणपत नरवाडे कामारीकर, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, अभियंता संजय मेकेवार, डॉ विलास ढवळे, सेवानिवृत्त उप विभागीय अभियंता श्रिराज भवरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशीनाथ पोपलवार, जेष्ठ शाहीर व्यंकट बैठकबिलोलीकर, केडीबेबरे पाटील, बळीराम जाधव सुजलेगावकर, बापुराव जमदाडे, शाहीर नरेंद्र दोराटे, शाहीर वाठवे किनवटकर,प रिसरात राठोड, अभियंता सर्वांनी,इदुरकर,पत्रकार वाठोरे,पत्रकार गायकवाड यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती, यावेळी  तेलंगणा, विदर्भ मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणात कलावंत उपस्थित होते,


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी