गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम घेतल्याने प्रशासन समाधानी - पो नि अशोक जाधव -NNL


अर्धापुर|
गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम घेतल्याने प्रशासन समाधानी आहे,गणेश मंडळ स्थापनेच्या मुख्य उद्देशासोबत गणेश भक्त असल्याचे उपक्रमशील गणेश मंडळाने पुन्हा सिद्ध केले आहे असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी केले.          

वृंदावन काॅलोणी गणेश मंडळ तामसा बायपास रोड अर्धापुर येथे मोफत मोतियाबिंदु शस्त्रक्रिया व सर्व रोग निदान बी,पी,शुगर तपासनी शिबीर कार्यक्रम संपन्न झाला यामधे विद्यार्थ्यासाठी भीती पत्रक चित्रकला संगीत खुर्ची निबंध स्पर्धा भाषन गायन गरजुना चश्मे वाटप  ईत्यादी व बक्षीस वितरण करण्यात आले  आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार  निळकंठराव मदने,उद्घाटक पोलिस निरीक्षक आशोक जाधव,कृऊबाचे दत्ता पाटील पांगरीकर, नगरसेवक डॉ,विशाल लगंडे नगरसेवक,बाबुराव लंगडे,पत्रकार ऊध्दव सरोदे, अॅड योगेश माटे,गोविंद साखरे , यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यामध्ये डॉ, शेख, आय, डी, नेत्र तज्ञ यांनी ९०  रुग्णांची नेत्र तपासणी केली तर 20 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले डॉ,एस आर कवठेकर यानी मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणी व बी,पी, शुगर तपासनी करुन औषधोपचार केला, तर डॉ झाडे यानी नेत्र तपासनी करून चश्मे नंबर काडले, अशा अनेक ऊपक्रमशील  कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने  निळकंठराव मदने यांनी अध्यक्षीय समारोप केला. समयोचीत भाषणे झाली व या कार्यक्रमाचे भरभरुन कौतुक करुन ‌प्रोस्साहीत केले तर सर्व गणेश मंडळानी वृंदावन काॅलोणी गणेश मंडळाचा आदर्श घ्यावा आसे आवाहन केले  यशस्वीतेसाठी गणेश मंडंळाचे अध्यक्ष विलास कापसे,पत्रकार  सचिन गायकवाड़,सचिव जगदीश रामावत, नवनाथ तिडके पाटील,हानमंत वाघमारे,दारासींग राठोड, विश्वनाथ बारशे,गजानन मोरे, गीताजी बारशे, कैलास भुस्से, जगन जाधव, गजानन वाघमारे, सौ,सत्यभामा ताई राठोड, काशीनाथ हापगुंडे यांची उपस्थिती होती, रक्तदान करुन कार्यक्रम यशस्वी केला‌ कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हानुमान फाटेकर यानी केले,प्रास्ताविक विलास कापसे यानी केले, आभार जगदीश रामावत ‌यांनी मानले.यावेळी मोठ्या प्रमाणावर रुग्णांसह शहरवासीयांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी