वरिष्ठाचे दुर्लक्ष ...! दोन कर्मचाऱ्यांवर पोस्ट खात्याचा डोलारा -NNL


हदगाव, शे.चांदपाशा|
नागरिकांच्या सेवेकरिता भारतिय पोस्ट खात्याचा कारभार शेकडो खातेदाराच काम केवळ दोन कर्मचाऱ्यांवर असुन त्यात अणखीन भर म्हणजे नेटवर्क व्यवस्थित नसल्यामुळे अनेक खातेदारांचि कामे खोंळबलेली आहेत. याचा ञास माञ ग्रहकाना होत आसल्याने या पोस्ट खात्याला नागरिक कमालीचे वैतगालेले असुन नाहक ञास सहन करावा लागत आहे. याकडे माञ पोस्ट खात्याच्या वरिष्ठ अधिका-याच कमालीचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. 

हदगाव शहरात एकमेव पोस्ट आफीस असुन २० हजारा पेक्षा जास्त खातेदार आहेत येथे दिवसभरात मणीआर्डर, रजिस्टरी, स्पीड, पोस्ट रेव्हनी तिकीट आर डी खातेदारांची प्रचंड गर्दी असते तर केद्र शासनाच्या १२पेक्षा जास्त  बचत योजना सुरु आहेत. त्यामुळे या पोस्ट आफीस मध्ये गुंतवणूक करणा-याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात ऐखादा कर्मचारी सुट्टी वर गेला तर पोस्टाचा सगळा भार एकच कर्मचाऱ्यांवर पडतो वेळेवर काम होत नसल्याने नागरिकांची फार हेळसांड होतांना दिसुन येत आहे. या पोस्ट आफीसला पाच कर्मचारी असल्याचे दिसुन येते. अपुरी कर्मचाऱ्यांच्या संख्यामुळे याचा फटका शेकडो नागरिकांना बसत आहे. ही बाब वरिष्ठ अधिका-याना माहीत असुन ही माञ ते 'मोण' धारण  केल्याचे दिसुन येत. 

खाते बंद होत आहे - पोस्ट खात्याच्या बचत योजना वाढाल्या मुळे खातेदारांची पण संख्या वाढत आहे पण पोस्ट आफीस मध्ये आल्यावर माञ आमच्या खातेदारांना नेट अभावी कामे होत नाहीत. परिणाम स्वरुप बहुतांशी खातेदारक खाते बंद करण्याच्या मणस्थित आहेत. कारण याकडे वरिष्ठ अधिका-याच पण लक्ष नसल्याने हे घडत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया अल्पबचत अभिकर्ता कडुन ऐकावायास मिळाल्या. 

वरिष्ठ अधिका-याची भुमिका बघुत करुत - हदगाव शहराच्या पोस्ट आफीसची बाबतीत प्रस्तुत प्रतिनिधीने जिल्हा पोस्ट आधिकां-याशी संपर्क साधला असता त्यानी सागीतले कर्मचारी सुट्टी वर आहेत. काही कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी जायला तयार होत नाही परंतु त्यांच्याबोलण्या वरुन माञ हदगाव शहराच्या पोस्ट आफीसच्या बाबतीत माञ गार्भिय दिसुन आले नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी