कोत्तावार परिवारातर्फे श्रमिक महिलांचा सन्मान श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे- सिद्धदयाल महाराज बेटमोगरेकर -NNL


मुखेड।
माकडाचा माणूस व्हायला लाखो वर्षे लागली पण माणसाचा माकड एका क्षणात होतो. मनुष्यत्व आणि देवत्व यात मनुष्यत्व ही अवघड बाब आहे म्हणून त्यासाठी माणूस होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी अशा सामाजिक परिस्थितीत कोत्तावार परीवाराने घरोघरी कामकरणाऱ्या श्रमिक महिलांचा स्टीलचा टिफिन देऊन केलेला सन्मान एक स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन शिवलिंग बादशहा मठसंस्थान बेटमोगराचे मठाधिपती, शिद्धदयाल महाराज यांनी व्यक्त केले.

कोत्तावार ऑइल मिल येथे आयोजलेल्या, मुखेड येथील प्रतिष्ठित व्यापारी स्व. अनिल रामराव कोत्तावार यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. कार्यक्रत प्रमुख अतिथी म्हणून मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे, पं.स. चे माजी सभापती बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, उपप्राचार्य संजीव डोईबळे, सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, संघटक तथा कार्यक्रसाचे आयोजक अशोक कोत्तावार, सचिव जीवन कवटीकवार, विक्रम निलावार, कृष्णा पेन्सलवार, प्रज्वल कोत्तावार, अमोल पत्तेवार यांची प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी बोलताना सिद्धदयाल महाराज पुढे म्हणाले की, स्व.अनिल कोत्तावार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त घरोघरी कामकरणाऱ्या श्रमिक महिलांना टिफिन डब्बा भेट देऊन केलेले स्मरण हे कोत्तावार परिवारांचा अभिनंदन उपक्रम आहे. अशा कार्यक्रमामुळे श्रमाला प्रतिष्ठान मिळाल्याशिवाय राहत नाही.आलेला प्रत्येक व्यक्ती ही जाणारच आहे परंतु मरावे परी कीर्ती रुपी उरावे, अशा कार्यातून स्मृतीचे जतन होते.


मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे म्हणाले की, पित्तर पंधरवड्यापेक्षा व्यक्तीला विचाराने जीवंत ठेवणे हे आगळे वेगळे पुण्यस्मरण होय. अनिल कोत्तावार यांची पोकळी कधीही भरून न निघणारी असली तरी गरजू महिलांना सन्मान करून भेटवस्तू देणे यातून मिळणारा आनंद अनमोल आहे. समाजाला थोडं दिल्यास परमेश्वर आपणास भरभरून देतो. घरोघरी काम करणाऱ्या महिलांनी आत्मसन्मान जोपासत आपल्या मुलांना शिक्षण द्यावे. स्वच्छतेचे कार्य म्हणजे परमेश्वराचे कार्य होय.बेटमोगरे महाराज म्हणजे आध्यात्म व विज्ञान यांचा संगम होय. कोत्तावार कुटुंबीयांचा हा उपक्रम प्रेरणादायी असून वेदनेची संवेदना जपणारा आहे. हे कार्य म्हणजे आत्मसन्मान जागा करणे होय. सिद्धदयाल महाराज यांचा सखोल अभ्यास आहे. बेटमोगरेकर महाराज म्हणजे आध्यात्म व विज्ञान यांचा संगम होय.

 प्रा. संजीव डोईबळे यांनी स्वर्गीय अनिल कोत्तावार यांच्या आठवणी जाग्या केल्या. स्व.अनिल हे माझे जवळचे मित्र होते. यांच्याकडे दूरदृष्टी होती कुठलेही कार्य ते विचारपूर्वक करायचे. दुर्लक्षित महिलांना टिफिन देऊन त्यांचा सन्मान करणे हे कार्य अनुकरणीय आहे. सदरील महिला आपल्या घरात काम केल्याशिवाय आपल्या घरात लक्ष्मी वास करत नाही असे गौरवोद्गार काढले. यावेळी उत्तम अण्णा चौधरी, प्रज्वल कोत्तावार, कृष्णा पेन्शलवार, लक्ष्मण पत्तेवार यांनी मनोगत व्यक्त केले. 

प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे आयोजक तथा सुप्रभात चे संघटक अशोक कोत्तावार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की माझा भाऊ स्व. अनिल यांचे स्मरण सामाजिक बांधिलकीतून व्हावे म्हणून कोत्तावार कुटुंबीय, मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे साहेब यांच्या सल्ल्याने विविध उपक्रम हाती घेत असते. मागील वर्षी हमाल माथाडी यांना ब्लॅंकेट चे वाटप करून आम्ही प्रथम पुण्यस्मरण केलं यंदा मात्र दुर्लक्षित पण अत्यावश्यक महिलांचा स्टील टिफिन डब्बा देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा प्रयत्न कोत्तावार कुटुंबीयांनी केला आहे. यास डॉ. दिलीपराव पुंडे साहेबांसह सुप्रभात मित्र मंडळाने मोलाचे सहकार्य केलेले आहे. यावेळी त्यांचा मित्रपरिवार व जमलेल्या सर्व पाहुण्यांचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव आगलावे यांनी केले तर जीवन कवटीकवार यांनी आभार मानले. कोत्तावार कुटुंबीय व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सर्व उपस्थित महिलांना टिफिन वाटप करून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. 

यावेळी कोत्तावार परिवारातील अशोक कोत्तावार, सौ प्रयाग कोत्तावार, अनुजा कोत्तावार, सौ. अच्युता निलावार, सौ. अमृता पेन्सलवार, प्रज्वल कोत्तावार, अच्युत कोत्तावार, गीता पत्तेवार, सौ. राजेश्री गंदेवार, एकता पत्तेवार, छायाताई पेन्सलवार, शिवाणी पेन्सलवार, अन्वीक निलावार, कु. आकृती पेन्सलवारसह  मधुकर पोलावर, राजीव गंदेवार, महेश पत्तेवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर पाटील, शिवाजी कोनापूरे, संपादक ज्ञानेश्वर डोईजड, मेहताब शेख, रामदास पाटील, भास्कर पवार, नामदेव श्रीमंगले, जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष प्रा.जय जोशी, डॉ. आर.जी. स्वामी, डॉ. एम.जे. इंगोले, डॉ. पी. बी. सीतानगरे, गोपाळ पत्तेवार, नंदकुमार मडगूलवार, एस. पी. कपाळे, मनोज जाजू, नारायणराव बिलोलीकर, बालाजी वट्टमवार, लक्ष्मीकांत चौधरी, दिनेश चौधरी, उत्तम कुलकर्णी, सुरेश गरुडकर, गणपतराव पाळेकर, डॉ. शिवानंद स्वामी,ज्ञानेश्वर नारलावार, सुरेश उत्तरवार, राधेश्याम जांगिड, सोहम स्वामी, सरवर मणियार यांच्यासह पाहुणे,मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्लक्षित महिलांना टिफिन वाटप या अफलातून कार्यक्रमामुळे कोतावार परिवाराचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी