काशी यात्रेला गेलेला ६७ भक्तांचा जत्ता किनवट रेल्वे स्थानकावर; भव्य सत्कार -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
साईबाबा संस्थानच्या किनवटच्या वतीने श्री सच्चिदानंद पवार गुरु स्वामी यांच्या नेतृत्वात काशी यात्रेला गेलेला ६७ भक्तांचा जत्ता आज सायंकाळी सात वाजता किनवट रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी श्री सच्चिदानंद पवार गुरु स्वामी यांच्या सह सर्व यात्रेकरूंचा सत्कार केला.                             

दिनांक १ सप्टेंबर रोजी किनवट येथून श्री साईबाबा संस्थान किनवटच्या वतीने सर्वसामान्य कुटुंबातील विधवा निराधार अशा महिलांचा संस्थांच्या वतीने खर्च करून काशी यात्रेसाठी हा ६७  यात्रेकरूंचा जत्ता श्री सचिदानंद पवार गुरुस्वामी यांच्या नेतृत्वात ५६  महिला आणि ११ पुरुष असा ६७ यात्रे करू भकतांचा जता १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता किनवट रेल्वे स्थानकावरून रवाना झाला होता. सलग तीन दिवस काशीमध्ये सर्व तीर्थयात्रा करून हे सर्व यात्रेकरू आज किनवट येथे सायंकाळी सात वाजता किनवट रेल्वे स्थानकावर पोचले.

यावेळी किनवट नगरीच्या वतीने किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी श्री सच्चिदानंद पवार गुरु स्वामी यांच्या समवेत यात्रेसाठी गेलेल्या सर्व भाविक यात्रेकरूंचा सत्कार केला. यावेळी त्यांच्या समवेत आशिष कंचनावार, श्रीनिवास गटलेवार, सुनील मच्छेवार, अश्विन पवार सागर ओदीवार आदीसह किनवट शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होरी. यात्रेकरूंच्या नातेवाईकांचीही मोठ्या संख्येने यावेळी किनवट रेल्वे स्थानकावर त्यांच्या स्वारसाठी उपस्थिती होती. सलग दोन वर्षापासून श्री साईबाबा संस्थान हे किनवट शहरातील व परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील गरीब महिलांना विधवा महिलांना निर्धार महिलांना काशी यात्रा करून घेतात सर्व खर्च साईबाबा संस्थान जातींनी केली जातो एवढेच नव्हे तर शाई बाबा संस्थांच्या वतीने दररोज किनवट येथील गोरगरिबांना दररोज अन्नदान केल्या जाते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी