अर्धापूर ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याची मागणी ; आंदोलन सुरू कोंढ्यात बेमुदत धरणे -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
राज्यात शेतकरी आंदोलनासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोंढा ( ता . अर्धापूर ) येथील गावकऱ्यांनी शासनाच्या आदेशानुसार ग्राम पातळीवरील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सोमवारी सुरू केले आहे.

या धरणे आंदोलनात गावातील गावकऱ्यांनी मोठा सहभाग नोंदविला . मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला . ग्रामीण भागातील विविध भागांचे कर्मचारी , अधिकारी हे मुख्यालयी राहत नाहीत तर तालुका , जिल्ह्याच्या ठिकाणी राहून आपले कर्तव्य बजावत असतात . तसेच मुख्यालयी न रहाता घर भाडे उचलल्या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . या प्रकारामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. तसेच विधानसभेत आमदार प्रशांत बंब यांनी घरभाडे भत्ता उचलल्याचा मुद्दा चर्चेत होता . 

या प्रकरणावरून आमदार बंब व शिक्षक यांच्यात वाद आणला रंगला आहे . ग्राम पातळीवरील सर्वच अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी रहावे , या मागणीसाठी कोंढा येथील झेंडा चौकात महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे . या आंदोलनात अॅड . बालाजी कदम , रामराव कोंढेकर , राम कदम , बालाजी कदम , प्रल्हाद कदम नवनाथ कदम , हरिभाऊ कदम , गोविंद कदम , किशनराव कदम , शंकरराव कदम , माधव जाधव , केशव कदम , अभिमान कदम , माधवराव कदम , कपिल कदम , राज कदम दिलीप कदम , रशीद शेख , शिवसांभ गोदरे , आनंदा ठेंगल , ज्ञानेश्वर वाघमारे , बंडू ठेंगल , सुरेश ससाने आदी सहभागी झाले आहेत .

ग्रामीण भागातील आरोग्य , कृषी, शिक्षण, महसूल, ग्राम विकास आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. याचा परिणाम गावांच्या विकासावर होतो . तसेच मुख्यालयी न रहाता घरभाडे उचलतात . ग्राम पातळीवरील सर्वच अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी रहावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे . प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी- रामराव कोंढेकर

 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी