नांदेड एज्युकेशन सोसायटीचे शैक्षणिक कार्य दिशादर्शक-कागलीवाल -NNL

‘सायन्स’च्या ज्युनइर विभागाच्या नूतन वास्तूचे थाटात उद्घाटन


नांदेड, अनिल मादसवार|
मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागात मागील 72 वर्षापासून नांदेड एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक क्षेत्रात करत असलेले कार्य मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या दृष्टिकोनातून गौरास्पद व दिशादर्शक असल्याचे उद्गार मराठवाड्यातील प्रसिद्ध उद्योगपती नंदकिशोर कागदीवाल यांनी व्यक्त केले.नांदेड एज्युकेशन सोसायटी व्दारा संचलित सायन्स कॉलेज, नांदेडच्या कनिष्ठ विभागाचे अत्यंत देखण्या व नाविन्यपूर्ण इमारत उद्घाटन नाथ उद्योग समुहाचे संस्थापक व सायन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रसिध्द उद्योगपती नंदकिशोर कागलीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे हे होते. 

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. मला जीवनात जे काही करता आले त्याचे सर्व श्रेय या महाविद्यालयास जाते. मला भेटलेली अनमोल अशी व्यक्ती म्हणजे जेष्ठ साहित्यीक नरहर कुरूंदकर सरांमुळे वाचनाची आवड निर्माण झाली. तीच पुढे माझ्या जीवनात कामाला आली. माणसाने आयुष्यभर विद्यार्थी म्हणून नवनविन शिकले पाहिजे, यश मिळविण्यासाठी शॉर्टकट नसतो, मेहनत व प्रामणिकपणा माणसाच्या जीवनाला दिशा व यशस्वी होण्यासाठी दिशादर्शक असतात. कॉलेजची एकूण प्रगती वाखान्याजोगी आहे. असे मत व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.डी. यू. गवई यांनी कनिष्ठ महाविद्यालयाची नविन वास्तू उभारण्या मागची भूमिका विषद केली व संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. 

आपले मनोगत व्यक्त करताना नांदेडएज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व बांधकाम समितीचे अध्यक्ष सीए.डॉ. प्रविण पाटील यांनी संस्थेने नविन इमारत बांधकाम कमीत कमी खर्चात कसे करता आले हे विषद करीत बांधकामाच्या गुणवत्तेत कुठे ही तडजोड केली नाही व कमीत कमी कालावधीत काम पूर्ण केले आहे. त्यामुळे बांधकाम समितीचे सर्व सदस्य दिपनाथ पत्की, प्रुफुल अग्रवाल, दिनेश राठोड, प्रा.सौ. रत्नाकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी इंजि.दिनेश राठोड, श्री.जे.बी. सावने, कंत्राटदार संजय जोंधळे व देणगीदार डॉ. कुंज्जमा काब्दे, डॉ. अदिती काब्दे, उद्योगपती मुलचंद निहलानी यांचा येथोचित सन्मान करुन सत्कार केला.नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव, प्रा.सौ. श्यामल पत्की यांनी आभार मानले तर अतिशय उत्कृष्ठ सूत्रसंचालन पिपल्सचे उपप्राचार्य प्रा.डॉ. अशोक सिद्देवाड व पिपल्सच्या शिक्षिका सौ.श्रध्दा सावळे यांनी केले. 

यावेळी मंचावर उपस्थित संस्थेचे सहसचिव ऍड.प्रफुल अग्रवाल, शालेय समितीचे अध्यक्ष ऍड.प्रदीप नागापूरकर, संस्थेचे कार्यकारीणी सदस्य श्री. नौनिहालसिंघ जहागिरदार, पिपल्स कॉलेजचे प्राचार्य आर. एम. जाधव, उपप्राचार्य प्रो. डॉ. लक्ष्मण शिंदे, उपप्राचार्या प्रा. डॉ.सौ. अरूणा शुक्ला, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एकनाथ खिल्लारे, प्रा.सौ. जे.डी. रत्नाकर, जी.सी. मेंबर प्रा.डॉ. विकास सुकाळे,प्रा.डॉ. ए.टी. शिंदे, माजी कुलगुरू डॉ. एन. व्हि. कल्याणकर, डॉ. एल. एम. वाघमारे, प्रा.दिनकर बोराळकर, डॉ. पी.एम. पाटील, एस.एस. नलवाड, प्रा. आर.के. देशपांडे, प्रा.जी. डी. देशपांडे, प्रा. सुर्यकांत जोगदंड सह अनेकजण उपस्थित होते. तसेच संस्थेचे सदस्य इंजि. द.मा. रेड्डी, सीताराम जाजू, बनारशीदास अग्रवाल, प्रभाकर कानडखेडकर, शंतनू डोईफोडे सह शहरातील प्रतिष्ठीत नागरिक डॉ. पुष्पा कोकीळ, डॉ. किरण चिद्रावार, सूर्यकांत वाणी, तसेच सायन्स कॉलेज, पिपल्स कॉलेज व पिपल्स हायस्कुलचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी विशेष कार्य करणारे प्रा.मुकुंद मुळे, प्रा.मुनेश्र्वर, प्रा.डॉ. बोरीकर, प्रा.डॉ. सातव, प्रा. सुतकर, प्रा.डॉ.बनसोडे, प्रा.डॉ.किरण शिल्लेवार, प्रा. एस.एफ. गोरे, प्रा. बैनवाड, प्रा. माया राऊत, प्रा.डॉ.सौ. वडजे, प्रा.सिमा पांडे, प्रा. अंबरखाने, प्रा. वनवे, प्रा. ठोसरे, प्रा. डूरके, प्रा.इंगोले, प्रा. बारोळे, श्री. गौतम वाघमारे सह अनेक जणाचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी