अतिवृष्टी नुकासानग्रस्त शेतकऱ्यांना ५४.७० कोटी रूपये मंजूर - आ. डॉ‌.तुषार राठोड -NNL

मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.डॉ. तुषार राठोड यांच्या प्रयत्नांना यश


मुखेड, रणजित जामखेडकर|
मुखेड तालुक्यांमध्ये यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने पावसाने झालेल्या शेतकऱ्यांना राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारच्या निर्णयानुसार वाढीव अतिवृष्टी अनुदान रक्कम म्हणून ५४ कोटी ७० लाख १९ हजार २०० रुपयांची मदत निधी मंजूर झाली .

लवकरच मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे ओला दुष्काळ अनुदान रक्कम मंजूर करण्यासाठी मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.डॉ.तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यामुळे येणाऱ्या दिवाळी गोड होण्याची आशा आहे . तालुक्यात खरीप हंगाम पेरणी नंतर ८ पैकी ६ महसूल मंडळात १३ जुलै आणि ७ ऑगस्टमध्ये मोठया प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती . पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे . शेतात सखल भागात पाणी साचल्याने पीक वाया गेले होते . अनेक भागात जमिनी माती खरडून जावून पिके आडवी झाली होती राज्य शासनाने १० ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेले बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफ नियमानुसार मदत म्हणून दुपटीने अनुदान वाढवून दिले. तसेच बांधीत क्षेत्राची मर्यादा ३ हेक्टरपर्यंत केल्याचे सरकारने जाहीर केले . तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला असून राज्य शासनाच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते . तालुक्यात केवळ ६४५ हेक्टर बाधित क्षेत्रच नुकसान झाल्याच्या बातम्या समाज माध्यमात आल्यानंतर आ . डॉ . तुषार राठोड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ . विपीन यांच्याशी संपर्क साधला . 

धर्माबादच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी २२ गावात पीक नुकसान अतिवृष्टीबाबत उलट पडताळणी केली व अतिवृष्टी बाधीत अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधकारी यांच्यामार्फत याची गांभीर्याने दखल घेण्यात आली . कृषी सहायक , तलाठी , ग्रामसेवकांनी एकत्रित अतिवृष्टी बाधीत क्षेत्रात जाऊन अहवाल तयार केला आणि त्याचा अहवाल शासनाकडे सुपूर्द केला . त्यात तालुक्यात ७७ हजार ८६४ क्षेत्रावर खरीप हंगाम पेरणी झाली असून ८ महसूल मंडळात ३ ९ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकाचे ५०.८२ टक्के नुकसान झाले आहे असा अहवाल पाठविला . त्यात ७४ हजार ८४ शेतकरी बाधित झाल्याचे नमूद करण्यात आल्याचे तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी सांगितले . राज्य शासनाने जिरायत शेतीसाठी १३ हजार ६०० रू प्रती हेक्टरी तर बागायतीसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टरी , बहुवार्षिक पीक साठी ३६ हजार प्रती हेक्टरी मदत जाहीर केली. 

त्यानुसार तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी एसडीआरएफ दराने २१ कोटी ४६ लाख ४२ हजार ४०० रू तर वाढीव दराने राज्य शासन निर्णय नुसार ३३ कोटी २३ लाख ५६ हजार २०० रूपये असे एकूण ५४ कोटी ७० लाख १ ९ हजार २०० रुपये मंजूर करण्यात आले. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे . महसूल मंडळ निहाय यादी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले . दरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली उपरोक्त आर्थिक मदत मिळवून देण्यात भाजपा आ . डॉ . तुषार राठोड यांनी शासन व प्रशासन पातळीवर सतत पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले . या मदतीमुळे सणासुदीच्या तोंडावर शेतकरी वर्ग आनंदित होऊन लोकप्रिय आमदार डॉ तुषार राठोड यांचे अभिनंदन करत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी