आता नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत काम पाहणार-NNL


मुंबई।
राज्यातील ४४ आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, लातूरचे मनपा आयुक्त अमन मित्तल, नांदेडचे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह जालन्याचे सीईओ मनुज जिंदल, किनटवचे सहायक जिल्हाधिकारी कीर्ती किरन एच पुजार या मराठवाड्यातील आयएएस अधिका-यांचा समावेश आहे. आता नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नांदेडचे मनपा आयुक्त म्हणून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. भगवंतराव पाटील, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून वर्धा जि. प.चे सीईओ सचिन ओंबसे नाशिकचे सहायक जिल्हाधिकारी वर्षा मिना यांची जालनाच्या सीईओपदी आणि कळवणचे सहायक जिल्हाधिकारी विकास मिना यांची औरंगाबाद जि. प. सीईओपदी बदली झाली, तर नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली झाली आहे.

सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच आज राज्यातील ४४ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लातूरचे मनपा आयुक्त अमन मित्तल यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून, तर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेंगावकर यांची पुणे येथील बाळासाहेब ठाकरे अ‍ॅग्री बिझनेस आणि ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक पदावर बदली झाली आहे. तसेच नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची, तर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. भगवंतराव पाटील यांची नांदेडचे मनपा आयुक्त म्हणून बदली झाली आहे. मात्र, नांदेड मनपा ड वर्गात मोडते. त्यामुळे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पाटील हे पदभार स्वीकारणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याशिवाय आयटीबीपी किनवट तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्ती किरन एच पुजार यांची रत्नागिरीच्या जि. प. सीईओ, कळवण आयटीबीपीचे विकास मिना यांची औरंगाबाद जि. प.चे सीईओ म्हणून, नाशिक आयटीबीपीचे विकास मीना यांची जालन्याचे जि. प. सीईओ पदावर बदली झाली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथील एमएससीईआरटीचे संचालक एम. देवेंदरसिंग यांची बदली झाली आहे. याशिवाय राज्यातील इतर अधिका-यांची बदली झाली आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त बदलण्यात आले आहेत. मनीष पाटणकर म्हैसकर यांची पर्यावरणीय आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या प्रधान सचिव पदावरुन बदली करुन त्यांना मुख्य राजशिष्टाचार अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मराठी भाषा विभागाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन बदली करुन त्यांना नागरी उड्डाण, मान्य प्रशासन विभाग, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर तुकाराम मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोग मुंबईच्या सचिव पदावरुन राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिका-यांच्या बदल्याची यादी (नाव आणि कंसात नव्याने झालेल्या नियुक्तीचे ठिकाण)

१) श्रीमती लीना बनसोड (अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे)

२) विवेक जॉन्सन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर)

३) डॉ. रामास्वामी एन. (आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्यम, नवी मुंबई)

४) अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी, नांदेड)

५) डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे (प्रधान सचिव, उद्योग विभाग)

६) श्रीमती.जयश्री एस. भोज (डीजीआयपीआर आणि एमडी, महा आयटी कॉर्पोरेशनचा अतिरिक्त कार्यभार)

७) परिमल सिंग (प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई.)

८) राजेश नार्वेकर (महापालिका आयुक्त नवी-मुंबई महानगरपालिका)

९) ए.आर.काळे (आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई)

१०) अभिजीत बांगर (ठाणे महापालिका आयुक्त)

११) डॉ.विपिन शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई)

१२) नीलेश रमेश गटणे, (मुख्य कार्यकारी अधिकारी,एसआरए, पुणे.)

१३) सौरभ विजय (सचिव, सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग)

१४) मिंिलद बोरीकर (मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ)

१५) अविनाश ढाकणे (मॅनेंिजग डायरेक्टर, दादासाहेब फाळके फिल्मनगरी)

१६) संजय खंदारे (प्रधान सचिव -१ सार्वजनिक आरोग्य विभाग)

१७) डॉ. अनबलगन पी.(अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी)

१८) दीपक कपूर, (अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभाग)

१९) श्रीमती. वल्सा नायर (प्रधान सचिव, गृहनिर्माण)

२०) श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर (प्रधान सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी, मंत्रालय, मुंबई आणि अतिरिक्त कार्यभार मराठी भाषा विभाग)

२१) मिंिलद म्हैसकर (प्रधान सचिव, नागरी विमान वाहतूक, सामान्य प्रशासन विभाग, मुंबई आणि अतिरिक्त प्रभार प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्क)

२२) प्रवीणचिंधू दराडे ( सचिव, पर्यावरण विभाग)

२३) तुकाराम मुंढे (आयुक्त एफडब्लू आणि संचालक, एनएचएम, मुंबई)

२४) अनुप कुमार यादव, (सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग)

२५) डॉ. प्रदीप कुमार व्यास (अतिरिक्त मुख्य सचिव, आदिवासी विकास विभाग)

२६) डॉ. अश्विनी जोशी (सचिव, वैद्यकीय शिक्षण)

२७) दीपेंद्र सिंह कुशवाह (विकास आयुक्त,उद्योग)

२८) अशोक शिनगारे (जिल्हाधिकारी, ठाणे)

२९) श्रीमती श्रद्धा जोशी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एमडी)

३०) मनुज ंिजदाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे)

३१) सचिन ओंबासे (जिल्हाधिकारी, उस्मानाबाद)

३२) अमन मित्तल (जिल्हाधिकारी, जळगाव)

३३) राजेश पाटील (संचालक, सैनिक कल्याण, पुणे.)

३४) श्रीमती आशिमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)

३५) कीर्ती किरण एच पुजार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी)

३६) रोहन घुगे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा

३७) विकास मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद)

३८) श्रीमती वर्षा मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना)

३९) के.व्ही.जाधव (संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई)

४०) कौस्तुभ दिवेगावकर, (प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण विकास प्रकल्प, पुणे)

४१) एम.देवेंद्र सिंग (जिल्हाधिकारी, रत्नागिरी)

४२) विवेक एल. भीमनवार (परिवहन आयुक्त)

४३) राजेंद्र ंिनबाळकर (व्यवस्थापकीय संचालक एमएसएसआयडीसी)

४४) डॉ. भगवंतराव नामदेव पाटील (महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालिका)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी