संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी - NNL


नांदेड|
संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.प्रबोधनकारांनी मांडलेला सत्यशोधक विचार आजही संपलेला नाही असे मत इंजि प्रविण जाधव यांनी यावेळी मांडले.

संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, जिल्हाध्यक्ष भगवान कदम,ॲड श्रीनिवास शेजुळे,जयदीप वाडकर, प्रदीप गुबरे, परमेश्वर पाटील,वक्ते इंजि प्रविण जाधव आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.विषमतेच्या विरोधात सत्यशोधक बाण्याने निर्भीडपणे लोकांच्या बाजुने उभे राहणारे केशव सिताराम ठाकरे हे खरे प्रबोधनकार होते शेती,स्त्रीया,युवक, कामगार, आदिवासी, शोषित यांचे प्रश्न कायम आहेत.वर्तमानात लोकशाहीच्या नावावर हुकुमशाही लादली गेली आहे. त्यामुळे हुकुमशाही नेस्तनाबूत करण्यासाठी संभाजी ब्रिगेड ने शिवसेना सोबत एकत्रित काम करण्याचे ठरवले आहे असेही पुढे बोलताना इंजि जाधव म्हणाले. 

१९२१ च्या दरम्यान प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन सुरू केले.त्यातुन त्यांनी प्रखर व सत्यवादी लेखणीतुन महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली.त्यांना प्रबोधनकार म्हणुन ओळख मिळाली.त्यामुळे संभाजी ब्रिगेड ने वतीने प्रबोधनकारांच्या विचाराला व ईतरही गौत्तम बुद्ध ते जिजाऊ, शिवराय,फुले,शाहु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संविधान या विचाराचा जागर व्हावा म्हणुन प्रबोधन-कारांचा जन्मदिवस महाराष्ट्रभर लोकप्रबोधन दिन म्हणुन साजरा करत आहे.भांडवलदार राज्यकर्ते, धर्मपुरोहीत यांच्या अभद्र मगरमिठीतुन जनतेला मुक्त करावे लागणार आहे तरच भारताचे संविधान व लोकशाही अबाधित राहणार आहे असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी मत व्यक्त केले. प्रबोधन-कारांनी सतीप्रथा, बालविवाह,विधवा पुनर्विवाहास बंदी,हुंडाप्रथा, पुरोहित शाही भांडवलशाही, अंधश्रद्धा,अनिष्ठ प्रथा या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला यावर प्रहार केला.असे मत आपल्या प्रास्ताविकात संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव परमेश्वर पाटील यांनी मत व्यक्त केले.

जिल्हाध्यक्ष भगवान कदम व जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांचेही यावेळी मनोगत झाले.प्रा बालासाहेब खानसोळे,प्रा कैलास शिंदे,प्रा सचिन गायकवाड, सचिन कदम मरळककर आदिंसह अनेकांनी संभाजी ब्रिगेड मधे प्रवेश केला. जिजाऊ वंदना शंकर कदम यांनी गायली,संचलन ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले. यावेळी मारोती मेंडेवाड, परमेश्वर खोसे, दीपक भरकड, अंकुश कोल्हे, संतोष आसर्जनकर,शिवम कदम, अशोक कदम,व्यंकट कदम, सतीश व्यवहारे, गजानन कदम,सचिन सुर्यवंशी, कैलास पवळे, दत्तात्रय देवकत्ते, भुजंग जाधव,सतीश जामगे यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी