हनुमान हिप्परगा जि.प.प्रा‌.शाळेला तालुकास्तरीय उत्कृष्ट शाळा पुरस्कार जाहीर -NNL

हनुमान हिप्परगा जि.प.प्रा. शाळेचे मुख्याध्यापक हणमंतराव बोडके व सहशिक्षक माधवराव बोडके यांचा गौरव 


मुखेड, रणजित जामखेडकर।
यशवंत सहकारी पतसंस्था देगलुर यांच्या वत्तीने तालुक्यातील शिक्षणरत्न पुरस्कार व उत्कृष्ट शाळा पुरस्कार वितरण सोहळा संस्थेच्या ३६ व्या  वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संपन्न झाला.  

यामध्ये देगलुर तालुक्यातील मौजे हनुमान हिप्परगा जि.प प्रा.शाळेला उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक हणमंतराव बोडके, सहशिक्षक माधवराव बोडके यांनी शाळेसाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल आ.अमरनाथ राजूरकर , आ.जितेश अंतापुरकर, नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसेटवार, शिवाजीराव देसाई बळेगावकर , यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करून गौरविण्यात आले आहे. यावेळी तालुक्यांतील सर्व प्रमुख पदाधीकारी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थीत संपन्न झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी