लोहयात डेंग्यू चे रुग्ण ; तुंबलेल्या नाल्या..कचऱ्याचे ढिग.. : ना- औषध.... ना... फवारणी -NNL


लोहा|
शहरात स्वच्छतेचा बोजार उडाला आहे.कोणाचा कोणाला पायपोस नाही .दरमहा जवळपास  अठरा लक्ष रुपये स्वच्छतेवर खर्च करणाऱ्या लोहा नगर पालिकेने शहरवासियांच्या आरोग्याशी जणू  खेळ सुरु केलेला दिसतो (?). जागोजागी तुंबलेल्या नाल्या. मुक्त डुकरांचा वावर ...कचऱ्यांचे ढिग अशी दुरावस्था. मुख्याधिकारी यांनी संबंधित कचरा टेंडरवाल्यानं  कोणतीच "कार्यवाही केली नाही. जुन्या शहरातील कलाल पेठ, साठे गल्ली भागात डेंग्यू तापीचे नऊ रुग्ण आढळले. त्यातील पाच जण नांदेड येथे उपचार घेत आहेत.उपाययोजना साठी....ना औषध- नाही फवारा.. अशी अवस्था आहे. सताधारी यांच्यातील बेबनाव व स्वमग्न' "कारभारी" असा स्थितीत  या डेंग्यू वर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

लोहा शहरातील घनकचरा टेंडर साठी दरमहा नगर पालिका जवळपास अठरा लक्ष रुपये खर्च करते पण टेंडर एकाचे अन चालविणारा दुसरा तरीही नगर पालिकेने  स्वच्छता बाबत डोळे उघडे ठेवलेले दिसत नाहीत. ' अद्याप  प्रभावीपणे स्वच्छता शहरात झालेली नाही . टेंडर मध्ये ज्या नियम-अटी आहेत त्याची अमलबजावणी होत नाही. दरमहा वाटून-चाटून सुरु आहे. आणि वरून संबधित मात्र कर्मचाऱ्यांची सूचना ऐकत नाहीत परिणामी शहरातील सगळ्यात भागात स्वच्छता बाबत बोंबाबोंब सुरू आहे.

●हतबल कर्मचारी.... मुजोर' गुतेदार'●

शहरातील स्वच्छतेची दैन्यावस्था आहे. जेमतेम स्वच्छता कर्मचारी असावेत. गल्लोगल्ली तुडूंब भरलेल्या नाल्या. कचऱ्याचे ढिग... साचलेले डबके व दलित वस्तीत मुक्तपणे डूकरांचा वावर.. असे अत्यंत खेदजनक स्थिती स्वच्छतेची आहे. कर्मचारी संबंधित टेंडर चालविणाऱ्यास सांगतात पण उलट  तोच' या कर्मचाऱ्यांना दठावत असतो. उलट ..... कोतवाल को ढाँटे' अशी अवस्था' . मुख्याधिकारी यांचा प्रभाव जाणवत नाही .ना घंटागाडी वेळेवर येते नाही गल्लोगल्ली भल्या पहाटे झाडले जाते ..सगळं कसं  निष्प्रभ ठरले आहेत.

●जुन्या लोहयात डेंग्यू रुग्णांना वाढ●

जून्या लोहा  शहरातील कलाल पेठ, साठे गल्ली येथे डेंग्यू तापीचे नऊ रुग्ण सापडले  त्यातील पाच  जणावर नांदेड येथे उपचार सुरु आहेत. या रुग्ण पालकांनी या भागात फवारणी करण्याचे सांगितले परंतु ना फवारा.. नाही औषध असे चित्र दिसले. औषध मागणी करावी लागते. त्यानंतर फवारणी होईल असे कर्मचारी सांगतात याचा अर्थ पावसाळ्यात साथीचे रोग होऊ नयेत यासाठी उपाय योजना आखल्या नाहीत असे दिसते असा संतप्त सवाल रुग्ण नातेवाईक यांनी केला आहे.

मागील महिण्यात डेंग्यू तापीचे रुग्ण नव्हते पण मागील आठ दिवसा पासून लोहा शहरात या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. कलाल पेठ, साठे गल्ली आंबेडकर नगर, मराठ गल्ली येथे डेंग्यू तापीचे रुग्ण सापडले आहेत असे डॉक्टरांनी सांगितले. डेंग्यू रुग्ण वाढ बाबत मुख्याधिकारी तसेच स्वच्छता विभागाचे इंजिनिअर यांच्याशी संपर्क केला. पण त्याचा संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे नगर पालिका  उपाययोजना काय करीत आहेत हे कळले नाही. 

●तुंबलेले गटार - मुक्त' वराह" संचार●

शहरात एकीकडे डेंग्यु तापी चा कहर वाढत असतानाच व नगर पालीकेच्या अस्वच्छतेच्या मनमानी कारभाराचा शहर वासीयांना  फटका सहन कारावा लागत आहे. स्वच्छतेची ऐसी की तैसी झाली आहे. तुंबलेले गटार.. कचऱ्याचे ढिग - मुक्त डूकरांचा संचार अशी स्थिती आहे , नगर पालिकेने वेळेत यावर उपाययोजना कराव्यात तसेच आंदोलन करू असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी