ईस्लापुर,कोसमेट परिसरात चोरटयाचा हैदोस....वाडी,तांडयासह विवीध गावातील नागरिक त्रस्त -NNL

भिसी येथील मंदिरातील दानपेटी फोडली...


किनवट, माधव सूर्यवंशी|
ईस्लापुर,कोसमेट परिसरात चोरटयाने गेल्या अनेक दिवसा पासुन हैदोस घातला असुन या चोरटयाने वाडी,तांडयासह विवीध गावचे नागरिक त्रस्त झाले आहे.या चोरटयाच्या भितीने दिवस रात्र व रात्र दिवस म्हणुन नागरिकांना सध्याला समजत आहे.तर दि.21 सप्टेबरच्या बुधवारी रात्रीला भिसी येथील गावाजवळील सदगुरु बाळुमामा मदिरातील दानपेटी फोडल्याची घटना घडली आहे. 

ईस्लापुर,कोसमेट परिसराला गेल्या अनेक दिवसा पासुन चोरटयाने लक्ष केंद्रित केले असुन चोरीच्या अनेक घटना या भागात घडल्या आहे. दुचाकी चोरी,टँक्टरची चोरी,भुसार दुकानातील सोयाबीनची चोरी,मंदिरातील दानपेटी फोडणे,मोटारी चोरणे,शेतातील बँट्या चोरणे,घर फोडुन सोने,चांदी,नगदी रक्कम चोरुन नेणे,दुकाने फोडणे,बियर शाँपी फोडणे यासह अन्य विवीध घटना या परिसरात गेल्या अनेक महिण्याखाली,वर्षाखाली घडल्या आहेत.

या घटनेचा तपास लागलाच नसताना आणखी या भागात चोरीच्या घटना परिसरात दिवसेन दिवस वाढताना दिसत आहे. दररोज वेगवेगळया घटना परिसरात घडत असल्याने व चोरटयाचा ईस्लापुर शहरासह विवीध गावात हैदोस वाढत असल्याने नागरिकाना रात्रभर जागुण काढावे लागत आहे.तर नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि.21 सप्टेंबर रोजी बुधवारच्या रात्रीला भिसी गावाजवळील संत सदगुरु बाळुमामा मंदिरातील दानपेटी चोरटयांनी फोडुन या दानपेटीतील चिल्लर व नोटा चोरुन नेले आहे.तर भिसी येथील दोन ते तीन घराला बाहेरुन कडी लावुन एका घरात शिरण्याचा प्रयत्न करत असताना घरातील माणसे जागी झाल्याने व आरडा ओरड केल्याने  चोरटयांनी तेथुन पळ काढला आहे.अश्या चोरीच्या घटना व चोरटयांचा हैदोस या भागात वाढतच आहे. वरिष्ट पोलीस अधिकायानी ईस्लापुर,कोसमेट परिसराकडे लक्ष केंद्रीत करुन या चोरटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकातुन होत आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी