लोकमान्य गणेश मंडळाच्या वत्तीने शहरात बहारदार लावणी कार्यक्रमाचे आयोजन -NNL


मुखेड,रणजित जामखेडकर|
मुखेड शहरातील लोकमान्य गणेश मंडळाच्या वत्तीने दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता लक्ष्मी प्रॉडक्शन निर्मित सिनेतारका तथा लावणीसम्राज्ञी अर्चना सावंत यांचा अप्सरा आली लावणीचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे. 

मागील २ वर्षापासून कोरोनाच्या सावटामुळे कोणतेही मोठे कार्यक्रम झाले नसून दरवर्षी प्रमाणे लोकमान्य गणेश मंडळाच्या वतीने याही वर्षी बहारदार लावणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातंग समाज समाजभूषण माजी आ. अविनाश घाटे हे असून या कार्यक्रमाचे उदघाटन बहुजन चळवळीचे जेष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य दशरथरावजी लोहबंदे यांच्या हस्ते होणार आहे.

 या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. हणमंतराव पा. बेटमोगरेकर, बीडचे शिवसेना संपर्क प्रमुख धोंडू दादा पाटील, नांदेड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, हदगाव हिमायतनगरचे माजी आ. नागेश पा.आष्टीकर, कंधार लोहा मतदारसंघाचे माजी आ. रोहिदासजी चव्हाण व नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिलीप पा‌. बेटमोगरेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमास तालुक्यातील प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी