हिंदी भाषेचा सराव आवश्यक - डी. प्रभाकर -NNL


नांदेड|
हिंदी भाषा बोलण्यास, समजून घेण्यास सोपी आहे. विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच हिंदी बोलण्याचा सराव केला पाहिजे. त्यासाठी हिंदी भाषा संवादाचे माध्यम बनले पाहिजे असे मत हिंदी भाषा व साहित्य चळवळीचे अभ्यासक डी. प्रभाकर यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार, हैदर शेख यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त जवळा दे. येथे जि. प. शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. पुढे बोलताना प्रभाकर म्हणाले की, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. ज्या राज्यात तेथील मातृभाषा बोलली जाते. परंतु देशभरात हिंदीचा वापर केला पाहिजे. इंग्रजी भाषा ही गरज आहे, मात्र विद्यार्थीदशेपासूनच हिंदीचा सराव आवश्यक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी