वाघाने पाडला गाईचा फडशा बोधडी शिवारातली गंभीर घटना -NNL


किनवट,माधव सूर्यवंशी।
बोधडी( बु.) येथील ज्ञानेश्वर कामाजी शिंदे या शेतकऱ्यांची गाय दिनांक 15 -9- 22 च्या रात्री 310 शेत सर्वे नंबर असलेल्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या गाईवर वाघाने रात्रीला अचानक हमला करून फडशात पाडला असे लेखी निवेदन त्यांनी बोधडी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिले आहे.

सविस्तर वृत्त असे की, किनवट तालुक्यात हिंसक वन्यपसूचा वावर हा नीत्याचाच असतो कधी मानवावर तर कधी पाळीव जनावर हमले होतच असतात. असाच एक गंभीर प्रकार 15- 9 च्या रात्री वाघाने गाईवर हमला करून तिचा फडशा पाडला, त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तरी वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना गाईचा मोबदला मिळावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी