दाढी करण्यात झालेल्या वादात सलून चालकाचे एकाचा गळा कापला, जमावाने सलून चालकाचा खून करून दुकान जाळले-NNL

ग्राहक व दुकांन चालकात पैशे देण्याघेण्यावरून झाला वाद, तणावपूर्ण वातावरण

किनवट,माधव सूर्यवंशी।
सलून मध्ये दाढी करत असताना अर्धी दाढी झाल्यावर दाढीचे पैसे दे असे म्हणून तगादा लावल्याने सलुन चालक व ग्राहकामधे वाद झाला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. सलून चालकाने आपल्या जवळील धारदार क्षेत्राने गळा कापून खून केला. तर संतप्त अज्ञात जमावाने सलूनच्या मालकास ठेचून खून केला व दोन सलूनचे दुकान व संबंधित सलून मालकाचे घर जळून खाक झाले. सदरील घटना बोधडी येथील बाजारपेठेत दिनांक 15 चे सायंकाळी साडेपाच ते साडे सहाचे दरम्यान घडली.

 


याबाबत प्राप्त माहिती अशी की, बोधडी येथे अनिल मारुती शिंदे वय अंदाजे चाळीस वर्षे हा नाभिक समाजाचा तरुण याची सलूनचे दुकान मार्केटमध्ये आहे. या सलून मध्ये सायंकाळी पाच ते साडेपाच सुमारास याच गावात राहणारा व्यंकटी सुरेश देवकर हा 22 वर्षे तरुण दाढी करण्यासाठी गेला. 
दाढी करत असताना अर्धी झाल्यावर देवकरला शिंदेने दाढीचे पैसे देऊन मागणी केली असता माझी दाढी पूर्ण कर दाढी झाल्यावर पैसे देतो असे सांगितल्याने दोघात वाद झाला वादाचे रूपांतर हानामारीत झाले आणि चक्क अनिलने वेंकटला धारदार शस्त्राने ने गळा कापून खून केला. 


ही बातमी वाऱ्यासारखी पसरतात देवकरच्या नातेवाईक जमाव करून प्रथम अनिल मारुती शिंदे या नावाचे सलूनचे दुकान जाळून टाकले व नंतर त्याचा शोध घेऊन त्याला गावाच्या भर मार्केटमध्ये ठेचून मारून खून केला व नंतर त्याचे घर जाळून टाकले. ही माहिती प्राप्त होतात किनवट पोलीस घटनास्थळी रवाना झाले अग्निशामक दलाची गाडी ही घटनास्थळी पोचली परिस्थिती शांत असल्याचे घटना माहिती प्राप्त होते. याबाबत अजून पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत असल्याचे समजते. गोधडी येथे ग्रामपंचायत ची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीच्या धामधुमीत अशा दोन एकाच वेळी झालेल्या दुहेरी हत्तेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले एवढे मात्र खरे...

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी