'पंचांग' या लघुचित्रपटाचा लोकार्पण सोहळा -NNL


नांदेड|
येथील विविध कलाकारांनी साकारलेला 'पंचाग' या लघुचित्रपटाचा लोकार्पण सोहळा शहरातील मालेगाव रोडस्थित हाॅटेल तरोडा येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी रोहन पंडित (राडा फेम), गोविंद वाघमारे, महेश अन्नापुरे, अभिनेते संजीव स्वामी, प्रल्हाद घोरबांड, मामीडवार नागनाथ (गीतकार), शंकर धोंगडे,(गायक), कवी शरदचंद्र हयातनगरकर, जेष्ठ कवी बिंगेवार, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, गोविंद महाराज यांची उपस्थिती होती. 

पंचांग या  शॉर्टफिल्म चे निर्माते कवी तथा दिग्दर्शक, कलाकार पांडुरंग कोकुलवार आहेत. पटकथा जगन्नाथ शिंदे यांची असून दिग्दर्शक महेश अन्नापुरे आहेत.  गोविंद वाघमारे यांचे निर्मिती व्यवस्थापन आहे, तर चित्रीकरण प्रफुल्ल यांनी केले. सदरील फिल्मचे आकर्षक संकलन समीर सोनसळे यांनी केले असून सुमधूर संगीत पुंडलीक इंगळे यांनी दिले आहे.  

कलाकार म्हणून गोविंद जोशी, रमेश गिरी, अजयराज राठोड यांच्यासह संजीव स्वामी, तुळशीराम कांबळे, आकाश कोथिंबीरे, प्रा. संजय वाघमारे, डाॅ. अर्चना धोटे, प्रल्हाद घोरबांड, पांडुरंग कोकुलवार, गजानन बेळगे, निरज मुदिराज, बबलू कळसे, दत्ता तालीमकर, मीनाक्षी मुळे, दादाराव बुक्तरे, निशा पंडीत, आकाश भालेराव, गंगाधर ईंगळे यांची प्रमुख भूमिका असलेला आणि इतर जवळपास ५० कलाकार असलेल्या या लघुचित्रपटाचे आकाश प्रकाशन युट्युब चॅनलवर प्रसारित करण्यात आले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी