नाजिमसह बँक शाखा सिडकोची एक कोटी थकबाकी उत्कृष्ट वसुली, सर्वसाधारण सभेत व्यवस्थापक व सचिव यांच्या सत्कार - NNL


नविन नांदेड।
नाजिमसह बँक शाखा सिडको शाखे अंतर्गत असलेल्या ९ गावातील शेतकरी सभासद यांच्या कडुन लोहा कंधार तालुक्यातुन थकबाकीमध्ये सर्व प्रथम एक कोटी वसुली केल्याबद्दल ९५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व अध्यक्ष वंसतराव चव्हाण व संचालक मंडळ यांच्या ऊपसिथीत शाखा व्यवस्थापक व तपासणी अधिकारी विठ्ठल पवळे व सचिव विलास कवडे यांच्या सत्कार करण्यात आला.

नाजिमसह बँक शाखा सिडको शाखे अंतर्गत शेतकरी सभासद यांच्या कडे ३० जुनं २०२२ अखेर एक कोटी ३४ लाख रुपये थकबाकी होती, शाखेचे तपासणी अधिकारी विठ्ठल दिंगाबर पवळे,व सचिव विलास अश्रोबा कवडे यांनी या साठी  थकबाकी शेतकरी बांधव यांच्या कडे प्रत्यक्ष भेट देऊन योग्य मार्गदर्शन करून थकबाकी जमा करण्याबाबत अहवान केले होते,या आवाहनाला प्रतिसाद देत थकबाकी एक कोटी रुपयांच्यी वसुली केली,ऊवरित थकबाकी काही महिन्यांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

नाजिमसह बँक मुख्य शाखेने सिडको शाखेच्यी नोंद ११ सप्टेंबर रोजी वासवी माता कन्यका परमेश्वरी मंगल कार्यालय सिडको येथे ९५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शाखेचे व्यवस्थापक विठ्ठल पवळे,व सचिव विलास कवडे यांच्या खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, बँकेच्ये अध्यक्ष वंसतराव चव्हाण व संचालक मंडळ यांच्या ऊपसिथीत शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

उत्कृष्ट वसुली केल्या बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय कदम, व्यवस्थापक एम.टी.शिंदे,प्रशासन विभाग महामुने,माधव पाटील शिंदे,शैती कर्ज विभाग ए.वही.मोरे, गव्हाणे,दक्षता पथकाचे प्रकाश पाटील पवार,सिनियर इन्स्पेक्टर नरवाडे, विशेष वसुली अधिकारी शिवकुमार बिरादार पाटील व मुख्य कार्यालतील अनेक विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी