नांदेड दक्षिण शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखपदी उध्दव पाटील शिंदे.. NNL


नविन नांदेड|
नांदेड दक्षिण तालुका प्रमुखपदी शिवसेनेचा शिंदे गटाच्या तालुका प्रमुखपदी उध्दव पाटील शिंदे यांच्या निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.

उध्दव पाटील शिंदे हे शिवसेने मध्ये निष्ठावंत शिवसैनिक ते पदाधिकारी म्हणून ओळख असुन खासदार हेमंत पाटील यांच्ये खंदे समर्थक म्हणून ओळख असुन आंदोलन व विकासात्मक कामे यासह सक्रिय सहभाग नोंदविला असून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत खासदार हेमंत पाटील यांच्या शिफारशीनुसार जिल्हा प्रमुख आंनदराव पाटील बोढारकर यांनी नांदेड दक्षिण तालुका प्रमुख पदी उध्दव पाटील शिंदे यांच्यी नियुक्ती करण्यात आली.

या निवडीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे वर्षा बंगल्यावर खा.हेमंत पाटील, संपर्क प्रमुख आंनदराव जाधव, जिल्हा प्रमुख आंनदराव पाटील बोढारकर,उमेश मुंडे, शहरप्रमुख तुलजेश यादव, यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले,या निवडीबद्दल  माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब महाराज, शिवाजी कदम, अनिल कवाळे, भगवान कवाळे,शंकर शिंदे, विठ्ठल शिंदे, सुरेश देशमुख, मारोती शिंदे,बाबु भरकड ,बाळु गुडेवार, साईनाथ शिंदे,गणपत देशमुख,ऊतम शिंदे, राम पाटील, ऊतम माली पाटील,व शिवसेनीक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी