वंचित बहुजन आघाडीच्या भिमनगर वाघाळा शाखेचा नामफलकाचे अनावरण -NNL


नविन नांदेड।
वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगरच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 येथील भीमनगर वाघाळा या शाखेच्या नामफलकाचे अनावरण दक्षिण महानगर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या ऊपसिथीत करण्यात आले.

१८ सप्टेंबर रोजी नावामनपा प्रभाग क्रमांक २० मधील भिमनगर वाघाळा शाखा नामफलक अनावरण  दक्षिण महानगर अध्यक्ष विठठल गायकवाड,रवी पंडित, तालुका अध्यक्ष प्रा. विनायक गजभारे, महानगर महासचिव अमृत नरंगलकर, युवा नेते सुदर्शन कांचानगिरे, युवा अध्यक्ष गोपालसिंग टाक, महिला अध्यक्ष संजना गायकवाड, साहेबराव भंडारे, शिवाजी कांबळे,मोतीराम गायकवाड, नागोराव गायकवाड, राजू जमदाडे, गौतम सोनसाळे, लुंबीनी नगर शाखा अध्यक्ष सुरेश पवळे,धम्मानंद गोपाळे, भीमनगर शाखा अध्यक्ष भगवान गजभारे साहेबराव ढवळे पत्रकार रवींद्र जोंधळे, व पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती.या वेळी तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाची पूजा करून उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीची भीमनगर वाघाळा या शाखेच्या नाम फालकाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

नंतर सर्व प्रमुख मान्यवराचे भीमनगर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे ध्येय व धोरणे सुदर्शन कांचनगिरे, रवी पंडित,प्रा. विनायक गजभारे व विठ्ठल गायकवाड यांनी पक्षाची भूमिका उपस्थितांना समजावून सांगितली, या नंतर मसुरे यांनी शाखेच्या वतीने पुढील काळात वंचित बहुजन आघाडी, व बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे अभिवचन दिले, नंतर सर्व उपस्थितांना खीर दान करण्यात आले. 

भीमनगर वाघाळा वार्ड शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष भगवान पिराजी गजभारे, महासचिव साहेबराव वैजनाथ ढवळे, उपाध्यक्ष अनिल कोल्हे,सचिव लखन गजभारे, संघटक, बंडू हाणवते,सहसचिव सचिन कांबळे, संघटक अशोक कोल्हे, दिलीप कांबळे, साधू जोंधळे,शंकर केरबा गंगावणे, नागोराव विठ्ठल गजभारे यांच्या सह पदाधिकारी यांच्या सह वॉर्डातील अनेक नागरिक महिला, युवक उपस्थिती होते ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धमानंद गोपाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखेचे नवनिर्वाचित महासचिव साहेबराव ढवळे यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी