एसटी कर्मचारी गणेश मंडळाची नांदेड आगारात स्थापना; ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे आकर्षक मूर्ती -NNL


नांदेड|
नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असणा-या एसटी कर्मचारी गणेश मंडळाची नांदेड आगारात स्थापना करण्यात आली असून सतत ३३ व्या वर्षी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे आकर्षक मूर्ती देण्यात आली असून गणपतीला नवस करण्यासाठी अनेक भक्त आवर्जून भेट देत आहेत.

बुधवारी वाहतूक निरीक्षक दिनेशसिंह ठाकूर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्री ची स्थापना करण्यात आली. यावर्षीचा गणेशोत्सव यशस्वी व्हावा यासाठी जय कांबळे, भाऊसाहेब शिंदे, बालाजी पाटील , नागभूषण भुसा, नागेश बडवणे, रुपेश पुयड हे एसटी कर्मचारी परिश्रम घेत आहेत. एसटी कर्मचारी गणेश मंडळाला दरवर्षी एसटीचे माजी कर्मचारी दिलीप ठाकूर हे मूर्ती देत असतात. याबाबत चौकशी केली असता  असता हृदयस्पर्शी माहिती मिळाली. १९८९ पर्यंत ठाकूर हे अंधश्रद्धा चळवळीचे श्याम मानव व दाभोळकर यांचे अनुयायी होते.  

गणेशोत्सवातील एका प्रसंगाने त्यांचे जीवन बदलून गेले. त्यांच्या आईचे सतत डोके दुखत असल्यामुळे नांदेडच्या डॉक्टरांच्या सल्यानुसार हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल मध्ये १९८९ साली दाखवण्यासाठी नेले होते. एक चाचणी केल्यानंतर आईला दिसेनासे झाले. त्यावेळी आई सोबत एकटेच असल्याने त्यांना काहीच सुचत नव्हते. घाबरलेल्या मनःस्थितीत असलेले दिलीप ठाकूर यांनी अपोलो हॉस्पिटलमध्ये असलेल्या गणेशमूर्तीला साकडे घातले. जर आईला पूर्ववत दिसू लागले तर  एसटी महामंडळाच्या गणपतीला पुढील वर्षी मूर्ती देईन असा नवस केला. चमत्कार म्हणा अथवा योगायोग काही वेळातच आईला पूर्वीसारखे दिसू लागले. 

तेव्हापासून नास्तिकाचे कट्टर गणेशभक्तांत रूपांतर झाले. एक वर्षाचा नवस असतांनाही प्रत्येक वर्षी  नांदेडच्या एसटी कर्मचारी गणेश मंडळाला ठाकूर हे आवर्जून गणेशमूर्ती देत असतात. सत्य गणपती येथे देखील त्यांनी शेकडो लोकांना सोबत घेऊन दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला 151 पायी यात्रा केलेल्या आहेत. कोरोना लॉकडाऊन च्या काळापासून या वाऱ्या बंद आहेत. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत एसटी कर्मचारी गणेश मंडळास गणेश मूर्ती देण्याचा निर्धार दिलीप ठाकूर यांनी केला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी