गाडीपुरा येथील श्री बालाजी मंदिरात यावर्षी ब्रह्मोत्सव उत्साहात साजरा होणार -NNL


नांदेड।
गाडीपुरा नांदेड भागातील श्री बालाजी मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे साजरा होणारा  ब्रह्मोत्सव कोरोना काळाच्या संकटातून दोन वर्षाच्या कालखंडा नंतर यावर्षी दिनांक २६ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या ब्रह्मोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली असून यावर्षीचा ब्रह्मोत्सव उत्साहात व धुमधडाक्यात साजरा होईल असे या मंदिराचे महंत आणि विश्वस्त श्री स्वामी सच्चिदानंद यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे .

प्रतिवर्षी साजरा होणारा ब्रह्मोत्सव कोरोना काळाच्या संकटामुळे दोन वर्ष मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नव्हता व आता या दोन  वर्षाच्या खंडानंतर यावर्षी दिनांक २६ सप्टेंबर २०२२ ते विजयादशमी ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत म्हणजेच नवरात्र पासून विजयादशमी पर्यंत श्री बालाजी मंदिर गाडीपुरा नांदेड येथे ब्रह्मोत्सव साजरा होणार आहे. या कालावधीत मंदिरात रोज सकाळी  ८ वाजता रामायण पाठ ,व्याख्यान, हवन ,कथा, कीर्तन, आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत .सकाळच्या सत्रामध्ये सूर्यप्रभा, कृष्ण लीला, सेवा मोहिनी अलंकार ,पालखी वाहन सेवा,हे कार्यक्रम रोज होऊन सहस्त्रकलशाभिषेक हा कार्यक्रम दि.४ ऑक्टोबर ला दुपारी १२ वाजता सुरू होईल .तसेच या दिवशी  रथपोक्षण व सुंदर कांडाचे पारायण होणार आहे. 

या कार्यक्रमा बरोबरच सायंकाळी स्वस्तिवाचन, रक्षाबंधन, अंकुर रोशन,देवता आवाहन, शेष आवाहन, राम अवतार, कल्याण उत्सव व विजयादशमीच्या या दिवशी ५ ऑक्टोबरला रथोस्तव होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात रोज ११ प्रकारचे भोग दाखवून भक्तांना श्री बालाजी देवतेस भोगगंगाळ सेवा करता येईल. या सेवेमध्ये खिचडी, चणा,   गोड भात,फुलहारा, शिरा, दहिभात, मालपुवा (नग ११ )वडा [नग १५], खीर, बुंदी नूकती, बुंदी लाडू नग सात या पदार्थाचे भोगगंगाळ सेवा भक्तांना करता येईल .तरी या सर्व कार्यक्रमात  भोग सेवेचा लाभ मोठ्या प्रमाणात भक्तांनी सहकुटुंब घ्यावा असे आवाहन मंदिराचे महंत तथा विश्वस्त श्री स्वामी सच्चिदानंद गुरु केशवाचार्य यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी