हिंदी भाषा सांस्कृतिक भाषिक दृष्ट्या समृद्ध- प्रा डॉ मुकुंद कवडे -NNL

श्रीसंगाम महाविद्यालयात  हिंदी दिवस  संपन्न 


लोहा|
हिंदी भाषा तांत्रिक, सांस्कृतिक व भाषिक दृष्टीने खूप समृद्ध आहे. तसेच हिंदी भाषेच्या अभ्यासातून अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा शिकण्यासाठी प्रामाणिकप्रयत्न करावेत. असे प्रतिपादन पीपल्स महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा डॉ मुकुंद कवडे यांनी केले.

लोहयाच्या  श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे  हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला. व्याख्यान  ठेवण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना  बक्षीस देण्यात आले मार्गदर्शक म्हणून पीपल्स महाविद्यालय नांदेड च्या हिंदी विभागाचे प्रा.डाॅ.मुकुंद कवडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोकराव गवते पाटील होते. महाविद्यालयाचे अध्यक्ष व्ही.जी. चव्हाण, हिंदी विभागप्रमुख प्राे.डाॅ.नानासाहेब गायकवाड, प्रा.डाॅ.अरुणकुमार भंडारे, स्तंभ लेखक प्रा.डाॅ. जयराम सूर्यवंशी हे उपस्थित होते.

प्रा डॉ कवडे यांनी हिंदी विषयाचे दैनंदिन जीवनात किती महत्व आहे हे विशद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विशद केले की, हिंदी भाषेच्या उत्थानासाठी हिंदी भाषेतून जास्तीत जास्त लोकव्यवहार झाले पाहिजेत. या भाषेला प्रेमचंद, कबीर, तुलसीदास यांच्यासारखे प्रतिभासंपन्न कवी, लेखक मिळाले आहेत. ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे असे नमूद केले.

 कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व्यक्त करताना डाॅ.नानासाहेब गायकवाड .केले महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री व्ही जी चव्हाण मनोगत मांडल  हिंदी सप्ताह निमित्त महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील केंद्रे ऋषिकेश, भालेराव चेतन, कु.महाबळे क्रांती, कु. नीलम कांबळे या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  स्तंभ लेखक प्रा.डाॅ.जयराम सूर्यवंशी यांनी केले  आभार डाॅ.अरुणकुमार भंडारे यांनी मानले.  कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी