पार्डीत एक चोराला रंगेहाथ पकडले -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने।
तालुक्यातील पार्डी (म) येथे रवीवारी गावकऱ्यासह  अर्धापूर पोलीसांनी एक चोरट्यास रंगेहाथ पकडून अटक केली आहे.

अर्धापूर तालुक्यातील कोंढ्यासह तीन गावात घरफोडी झाल्याने पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी गावागावात बैठका घेऊन सुरक्षा पथक स्थापन केले, त्यामुळे अनेक गावात तरुण गस्त घालून पोलीसांच्या संपर्कात आहेत, तालुक्यात चोरांची चर्चा जोरात असल्याने अफवांवर विश्र्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दि.१८ सप्टेंबरला रवीवारी दुपारी पार्डी येथे दुचाकीस्वारास दगड मारुन अडविण्याचा प्रयत्न केला, पेट्रोल पंपाजवळून एकाचा मोबाईल चोरुन पार्डी गावात दोन चोरटे शिरले, गावकऱ्यांनी व पोलीसांनी यांचा पाठलाग करुन रविवारी दुपारी एकास पकडले,तर एक जण पळून गेला.

या आरोपीचे नाव शेख तहेमीर शेख समीर वय (१९),रा.ताजनगर उमरखेड व मोहम्मद अल्ताफ मोहम्मद शफी वय (२२) रा.ताजमजीद परीसर येथील रहिवासी आहेत,यांनी पार्डी ते नांदेड दरम्यान चोऱ्या केल्याची माहिती मिळते, याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात कलम ३९२ (३२) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील व पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार तय्यब अधीक तपास करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी