जागलीसाठी जात असताना नाल्याच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
गेल्या दोन दिवसापासून किनवट तालुक्यामध्ये संतत धार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी नाल्याला पूर आला आहे. डोंगरगावची येथील मल्हारी महिपती मेंढे हा शेतकरी आपल्या शेतात जागलीसाठी जात असताना नाल्याच्या पाण्यात वाहून जाऊन मरण पावला आहे.

दिनांक 11 सप्टेंबर रोजी किनवट तालुक्यातील जलधरा मंडळात दिवसभर सतत पाऊस पडत होता या पावसामुळे नदी व नाल्याला (ओढ्याला) पूर आलेला आहे. डोंगरगाव (ची) येथील शेतकरी मल्हारी महीपती मेंढे वय 42 हा रात्री गावातून जेवण करून अंदाजे रात्री अकरा वाजता जंगली जनावरापासून शेतीचे जागरण करण्यासाठी शेताला जात होता वाटेमध्ये एक नाला आहे. या नाल्यातून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा शेतकरी पुराच्या पाण्याने वाहून जाऊन पुढे गावाजवळील काट्या कुट्याला अडकलेला त्याचा मृतदेह सकाळी सापडला. या इसमास प्राथमिक आरोग्य केंद्र जलधारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अप्पाराव पेठ येथील डॉ.वाडेकर यांनी शवविच्छेदन केले. 

पोलीस स्टेशन किनवट येथे अकस्मात मृत्यू गुन्हा नंबर 22 अंतर्गत नोंद घेऊन पोलीस जमादार बाळासाहेब पांढरे यांनी पंचनामा केला. या मयतास पत्नी तीन मुली असा परिवार आहे. करता पुरुष गेल्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. या मताच्या वारसास नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून माजी उपसभापती खंडेराव मोदे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील सोळंके, माजी सरपंच बामनाजी मेटकर हे प्रयत्न करत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी