बुद्धाचा धम्म समानतेचा महासागर - भदंत पंय्याबोधी थेरो -NNL


नांदेड|
अनेक नद्या एकत्र येऊन महासागराला येऊन मिळतात आणि एकत्व प्राप्त करतात तसे बौद्ध धम्माचे तत्वज्ञान आहे. धम्मात सर्व समान आहेत. कुठलाही भेदभाव नाही. धम्म समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या चतु:सुत्रीवर आधारलेला आहे. त्यामुळे इथे कुणीही येऊ शकतो आणि राहू शकतो. बुद्धाचा धम्म समानतेचा अधिकार देणारा महासागर आहे असे प्रतिपादन धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. 

यावेळी भिखू संघरत्न, चंद्रमणी, श्रद्धानंद, शिलरत्न, सुनंद यांच्यासह उत्तम रावळे, विपश्यनाचार्य भावे, माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे,  प्रा. प्रदीप सुकाळे, मारोती धतुरे, यशवंत गिरबिडे, प्रज्ञाधर ढवळे, निवृत्ती लोणे, आप्पाराव नरवाडे, नागोराव नरवाडे, सिद्धांत इंगोले  आदींची उपस्थिती होती. भाद्रपद पौर्णिमेनिमित्त परित्राणपाठ, धम्मध्वजारोहण, त्रिरत्नवंदना, बोधीपुजा, सूत्तपठण, ध्यानसाधना, धम्मदेसना व्याख्यान, भोजनदान, आर्थिक दान पारमिता आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दरमहा पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील  श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भाद्रपद पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप, धूप आणि पुष्पपूजन झाल्यानंतर भिखू संघास पुष्प देवून वंदन करण्यात आले, दहा मिनिटे ध्यान साधना करण्यात आली. याचनेनंतर उपस्थित बौद्ध उपासक उपासिका, बालिका यांना त्रिसरण, पंचशील देण्यात आले. त्रिरत्न वंदना, बोधीपूजा संपन्न झाली. 

गोंधळी समाजाच्या नवरखेले  कुटुंबास बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली.  सुमन बोरीकर, उषा नरवाडे, रेखा गजभारे, छाया सूर्यवंशी, सुजाता शेळके , अनिता सोनकांबळे, सुनीता वाघमारे, शांता सोनकांबळे, ताई कांबळे यांच्याकडून सर्वाना भोजन दान दिले. त्यानंतर दान पारमिता झाली. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी कैलास नगर, स्वागत नगर, हर्ष नगर, गोविंद नगर, हत्ता, घोडा कामठा, सप्तगिरी कॉलनी, खुरगाव येथील बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती. 

कुशल कर्म करुन पुण्य अर्जित करावे

वर्षावासात एकूण चार पौर्णिमा येतात. भाद्रपद पौर्णिमा ही वर्षावासात येणारी तिसरी पौर्णिमा. या वर्षावासाची सुरवातही अहिंसेच्या पुरतेखातर, करूणा व मैत्रिभावणेच्या गरजेतुन झाली. पावसाळ्याच्या दिवसातभिक्खूगण एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी चालत जातांना गवतातील कीटक त्यांच्या पायाने मारले जायचे. अशा प्रकारेही आपणावर हिंसेचे पातक नको, म्हणून वरील तीन महिन्यांच्या कालावधीपूरती भिक्खुंची भ्रमंती स्थगित करून कोणा एका ठिकाणी मुक्काम करून धम्माची शिकवण भिक्खुंनी अनुयायांना द्यावी असे वचन भगवंतांनी घातले.भगवान बुद्धाने संबोधी प्राप्त केल्यानंतर धम्म-प्रचाराच्या कालावधीत ४५ वर्षे सतत पायी प्रवास करून पवित्र असा धम्म जगास दिला. 

भगवंतांनी आपला वर्षावास सारनाथ येथे संपन्न केला. त्यांच्या सारनाथ येथील वर्षावासांसह एकूण ४६ वर्षावास झाले.  भगवंताचा प्रसेनजीत राजास उपदेश, वर्षावासाची तिसरी पौर्णिमा, भगवान बुद्धाचे वर्षावास, भगवंताचा प्रसेनजीत राजास उपदेश या घटना घडल्या आहेत. तथागत जेतवनात असतांना राजा प्रसेनजीत त्यांच्याकडे गेला व धम्मोपदेश देण्याची हात जोडून विनंती केली. मानवी आयुष्य सुखी आणि समृद्ध बनविण्यासाठी पद, पैसा, प्रतिष्ठा असून भागत नाही. व्यक्तिमत्वाचा विकासात मनाचा विकास आवश्यक आहे. पंचशील, अष्टशिलाचे पालन करुन दहा पारमितांचे अनुसरण करावे तसेच कुशल कर्म करुन पुण्य अर्जित करावे, असे भदंत पंय्याबोधी थेरो यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी