सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी मुदतीत आयकर विवरणपत्र दाखल करावे -NNL

आयकर अधिकारी जोशी यांचे आवाहन


नांदेड|
सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी मुदतीत लेखापरीक्षण अहवाल व आयकर विवरणपत्र दाखल करावे असे आहवान आयकर अधिकारी श्रीहरी जोशी यांनी केले आहे.

विश्वस्त संस्था तथा धर्मादाय संस्था यांच्यासाठी शुक्रवारी (दि. २३) पीपल्स कॉलेजमध्ये आउटरिच प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औरंगाबादचे आयकर अधिकारी श्रीहरी जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी सीए डॉ. प्रवीण पाटील तर  येथील आयकर अधिकारी प्रदीप पराते,आयकर निरीक्षक किरण मदने आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्रीहरी जोशी म्हणाले, की सेवाभावी, स्वयंसेवी संस्था या सर्वसामान्यांसाठी कार्य करतात यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा झालीच पाहिजे मात्र आपल्याला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये व व्यवहार पारदर्शक आहे.

हे स्पष्ट करण्यासाठी मुदतीत लेखापरीक्षण अहवाल व आयकर विवरणपत्र दाखल करावे असे आवाहन करतच याबाबतचे महत्व पटवून दिले. अध्यक्षीय समारोपात सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी आयकर कायद्यातील विविध तरतुदींची माहिती दिली. प्रास्ताविक आयकर अधिकारी प्रदीप पराते यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. यादव यांनी केले. आभार आयकर निरीक्षक किरण मदने यांनी मानले. विश्वस्त संस्थासाठी उपयुक्त माहिती मिळाल्याने उपस्थित सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांनी संयोजकांचे आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी