गोपाळचावडी ग्रामपंचायत येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त जेष्ठ नागरिक यांच्या सत्कार -NNL


नविन नांदेड।
मराठवाडा मुक्ती संग्रामादिनाचे औचित्य साधून  ग्रामपंचायत कार्यालय गोपाळचावडी येथे गावातील जेष्ठ नागरिक व जेष्ठ महिला यांच्या संरपच गिरजाबाई डाकोरे व उपसंरपच साहेबराव सेलुकर , ग्रामविकास अधिकारी बालासाहेब पवार यांनी ३६ जणांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार केला,या उपक्रमाचे परिसरातील अनेकांनी अभिनंदन केले.

१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामादिनाच्या निमित्ताने गोपाळचावडी येथे संरपच गिरजाबाई डाकोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,या नंतर गावातील जेष्ठ नागरिक ,महिला यांच्या शाल हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी माजी सरपंच चौत्राबाई शिंदे,केवळाबाई परशराम डाकोरे,मंजुळाबाई गजभारे, कमळाबाई दिवटे,चंपत महाजन मैलगे,गयानोबा गजभारे,भिवाजी डाकोरे,केशव शिरसे, गंगाराम दिवटे, शेषेराव सेलुकर ,हैबती डाके, शेषेराव मैलगे, पांडुरंग डोगंरे यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रामपंचायत सदस्य अशोक अंकुलवार, सदस्य प्र पत्रकार अनिल धमने , सुरेखा लाखे,कविता कतुरे, हणमंत मैलगे,सदस्य प्र, रमेश तालीमकर ,प्रदीप लाखे, आशिर्वाद डाकोरे, यांच्या सह गावातील व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, व शिक्षक, अंगणवाडी ताई , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय गोपाळ चावडी यांनी या ऊपकमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी