अल ईम्रान प्रतिष्ठानच्या राष्ट्रभक्ती जागरास उदंड प्रतिसाद -NNL


नांदेड।
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अल ईम्रान प्रतिष्ठान,बिलोली च्या वतीने कुसूम सभागृहात आयोजित केलेल्या एक शाम आजादी के नाम या राष्ट्रभक्ती जागृत करणाऱ्या संगीतमय सोहळ्यात संगितप्रेमीं व जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला.

प्रसिद्ध गायक एम.डी.जमाल यांच्या उपस्थितीत व नियोजना खाली गोपी पिक्चर चा "सुख के साथी दु:ख में ना कोई"या गिताने सदरिल कार्यक्रमाची सुरुवात झाली.या गाण्याला प्रेक्षकांकडून वन्स मोर,वन्स मोर अशी पुन्हा हेच गीत गाण्यासाठी फर्माईश आली. देशभक्ती, एकता, भाईचारा,एकोपा यावर आधारित गाण्या बरोबरच जुन्या अविर व अजरामर झालेल्या गाण्यांची मैफिल हे या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्ये होते.सभागृहा बाहेर पावसाच्या धारा आणि सभागृहात सप्तसुरांच्या सुमधुर धारा असा अनोखा संगम पाहावयास मिळाला.

प्रारंभी या कार्यक्रमांचे प्रमुख पाहुने म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे,अखिल भारतिय ब्राम्हण महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष निखिलभाऊ लातूरकर,ज्येष्ठ रंगकर्मी जुगलकिशोर धुत,नगरसेवक प्रतिनिधी मिर्झा आझम बेग,युवा सामाजिक कार्यकर्ता वाजेद अन्सारी,सहशिक्षक सुभाष मद्देवाड, डाॕ,शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अभ्यास मंडळाचे सदस्य अब्दुल हबीब आदि मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक एम.डी.अन्वर यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे संयोजक तथा अल ईम्रान प्रतिष्ठान चे ईजि.ईम्रान खान यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलींद सोनसळे,प्रा.आरीफ शेख,शमशोद्दीन काजी,नईम खान,मोईन कामरानी,इंजी.गजानन कांनडे,चंदन मिश्रा, गौतम कांबले, आदींनी परिश्रम घेतले.शेवटी कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगिताने करण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी