ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सिडको परिसरासह ग्रामीण भागात श्रीची उत्साहात स्थापणा -NNL


नविन नांदेड।
ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री गणेश मुर्तीची उत्साहात स्थापना ढोलताशांच्या गजरात  गणपती बाप्पा मोरया,या जयघोषात करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

 तब्बल दोन वर्षांचा कोरोणा काळानंतर यावर्षी श्री गणेश आगमन ३१ आगसष्ट रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह लहान मोठ्या मंडळींनी ढोल ताशा गजरात पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाचा गजरात वाजत गाजत सकाळ पासूनच लहान मोठ्या मुर्तीच्या आगमन होते होते,तर सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ मध्ये,व मुर्ती कारखानदार असलेल्या कौठा, वसरणी परिसरातील भागात मंडळांनी तर काही मंडळांनी परराज्यातील हैद्राबाद व राज्यातील अनेक जिल्ह्यांतुन विविध आकर्षक अश्या मोठ्या मुर्ती सार्वजनिक मंडळ यांनी आणल्या आहेत.

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत शहरी भागात १७ व ग्रामीण भागातील १८ गणेश मंडळांनी नोंद केली असून गणेश आगमन निमित्ताने पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत ११ अधिकारी, पोलीस अंमलदार ४३,व होमगार्ड ४४ बंदोबस्त ठेवला होता, तर सिडको परिसरातील मुख्य बाजारपेठ मध्ये ही पोलीस बंदोबस्त मुळे अनेक नागरीकासह  व्यापारी व ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला.

सिडको हडको परिसरातील ओकांर, युवाशक्ती,श्री वक्रतुंड, महाकाल,शिवगणेश, आदर्श,शंभुनारायण ,श्री एकता, अष्टविनायक, क्रांती,एकता नृसिंह, स्वराज्य, कपिलेश्वर, छत्रपती गणेश,एकता नृसिंह तर ग्रामीण भागातील न्यु एकता गोपाळ चावडी, नवयुवक बाभुळगाव,आझाद हिंद कांकाडी, संकटमोचक एम आय डी,सी, चौक,शिवशंकर गणेश राहेगाव,एंकदत गोपाळ चावडी जिंदम नगर,ओकांर तिरूपती नगर बळीरामपुर, दुर्ग वाडा विष्णुपुरी,शिव गर्जना सुनिल नगर बळीरामपुर,श्री वाल्मिक बाल गणेश मंडळ देगलुर नाका,साई गणेश मंडळ गुंडेगाव,नवसाक्षर मंडळ खुपरसवाडी ,जय बजरंग तुप्पा, शिवभक्ती गाडेगाव, जयहिंद गोपाळ चावडी, नवयुवक वाजेगाव, विश्व विनायक वाजेगाव,या  सार्वजनिक मंडळांनी नोंद केली असून यासह अनेक शहरी व ग्रामीण भागातील मंडळे नोंदणी करत आहेत.

सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या जुना कौठा वसरणी, सिडको, हडको असदवन,वाघाळा यासह प्रभाग क्रमांक १९ व २० मधील सार्वजनिक मंडळांना रितसर परवानगी देण्यात येत असुन सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे यांच्या मार्गदर्शनाखाली   कर निरीक्षक सुधीर बैस,दिपक पाटील, सुदेश थोरात व वसुली लिपीक मारोती सांरग,मालु एनफळे,मारोती चव्हाण,व लिपीक यांनी दिलेल्या अहवालानुसार रितसर परवानगी दिली आहे. सिडको हडको शहरी भागातील परिसरासह ग्रामीण भागात सायकाळ पर्यंत श्री गणेश मुर्तीची वाजत गाजत विधीवत पूजा करून स्थापणा केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी