शिवणीच्या देशमुख परिवारास आष्टीकर यांच्याकडून सांत्वन भेट -NNL


शिवणी।
किनवट तालुक्यातील शिवणी येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन  साहेबराव भाऊराव देशमुख यांच्या पत्नी तथा हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या वहिनी कै.पंचफुलाबाई देशमुख यांचे ४ सप्टेंबर रविवारी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्यावर दि.०५ सप्टेंबर सोमवार रोजी शिवणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

या अंत्यविधीस माजी महसूल राज्य मंत्री डी. बी.पाटील व माजी खासदार सुभाष वानखेडे आणि  शिवणी परिसरसह किनवट व नांदेड जिल्ह्यातील विविध राजकीय सामाजाजीक मंडळी व पाहुणे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय अंत्यविधीस उपस्थित होते.या अनुषंगाने हदगाव हिमायतनगर चे माजी आमदार तथा नुकतेच नांदेड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून निवड झालेले नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवणी येथे येऊन साहेबराव भाऊराव देशमुख यांना भेटून देशमुख परिवाराचे सांत्वन केले.यावेळी सोबत  शिवसेना जिल्हा समन्वयक अड. परमेश्वर पांचाळ,हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिगंबरराव पाटील वाळकीकर,ज्येष्ठ पत्रकार आरविंद जाधव,दत्तराम पाटील वायपणकर,भुजंगराव पाटील नंदगावकर, सुमित जाधव कोल्हारीकर सह परिसरातील शिवसैनिक आदी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी