मुखेड - लातुर रोडवरील झालेल्या २ वेगवेगळ्या अपघातात २ ठार तर २ जण जखमी -NNL

दोंन्ही अपघातात दुचाकी चालकांचा दुर्दैवी मृत्यू


मुखेड, रणजित जामखेडकर।
आज दि ६ सप्टेंबर रोजी मुखेड तालुक्यात हिप्परगा व लातुर फाटा, संबुटवाड पेट्रोल पंप परिसर मुखेड येथे दोन वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातात २ ठार व २ जण जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , मुखेड तालुक्यातील दापका राजा येथील शिवाजी तेलंग या युवकाचा हिप्परगा फाटा येथे हिप्परगा फाट्याजवळ समोरा समोरुन येणाऱ्या बस क्र . एम.एच १३ सी.यु ७ ९ ०५ च्या बसचा अंदाज न आल्याने हिप्परगा फाटा चौकात बसच्या धडकेत सकाळी १० च्या सुमारास अपघात झाला . यात शिवाजी तेलंग वय वर्षे १७ याचा जागीच मृत्यू झाला आहे . कोमल शिवाजी तेलंग वय १६ वर्ष रा . दापका राजा ता . मुखेड ही मुलगी जखमी झाली . मयत शिवाजी तेलंग यांच्या पश्चात आई , वडील , एक बहिण असा परिवार आहे .

 तर मुखेड लातुर फाटा, संबुटवाड पेट्रोल पंप येथे झालेल्या दुस - या घटनेत पिक-अपचा व दुचाकी क्र . एम एच २६ बिटी ०५६१ चा अपघात होऊन ब्रम्हानंद गणेश पांचाळ वय ३० वर्ष रा . शिरूर दबडे व राजेश पोतलवाड वय २७ वर्ष रा . मुखेड हे दोघे जखमी झाले . यानंतर ब्रम्हानंद पांचाळ यांना उपचारसाठी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल करण्यात आले होते मात्र पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले उपचारासाठी जात असतानाच ब्रह्मानंद पांचाळ चा मृत्यू झाला . मयत ब्रम्हानंद गणेश पांचाळ याच्या प्रश्चात पत्नी , एक लहान मुलगा , आई , एक भाऊ , एक विवाहित बहिण असा परिवार आहे . मयताचे प्रेत मुखेड उपजिल्हा रुग्णालय मध्ये आणताच नातेवाईकानी एकच हंबरडा फोडला आहे . या दोन्ही घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी