जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन महत्त्वाचे प्रा.राहुल नावंदर -NNL


नांदेड|
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी नियोजन अत्यंत आवश्यक आहे. नियोजनाशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होऊ शकत नाही असे प्रतिपादन द स्टुडंट अकॅडमी नांदेडचे प्रा. ॲड. राहुल नावंदर यांनी केले, ते देगलूर नाका नांदेड येथील कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित "तयारी स्पर्धा परीक्षेची"  या विषयावर बोलताना केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उर्दू विभाग प्रमुख प्रा. मोहम्मद इस्माईल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून द स्टुडन्ट अकॅडमी नांदेड चे प्रा.राहुल नावंदर आणि प्रा.राम तावडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नात द्वारे लमत गौहर अब्दुल नईम हिने केली. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब भुक्‍तरे यांनी केले. पुढे बोलताना प्रा नावंदर म्हणाले की, विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी नियोजन पूर्वक अभ्यास केला तर यश मिळते.नियोजन, उजळणी आणि सराव ही यशाची त्रिसूत्री आहे. स्पर्धा परीक्षा ही एक अशी संधी आहे ज्याद्वारे विद्यार्थी आपले अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात आणू शकतात. 

यासाठी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे मार्गदर्शनाशिवाय यशाची दिशा मिळत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना अभ्यास कसा करावा?, नोट्स कशा काढाव्यात ?,व्यक्तिमत्व विकास कसा करावा? महाविद्यालयीन काळच ही पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी स्वतःला ज्ञान, कौशल्य आणि संतुलित व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्यासाठी सर्व संधी उपलब्ध करून देते. सात्विक आहार,गाढ झोप आणि व्यायाम हे निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे. ध्यान,वाचन आणि निसर्गाचा सहवास हे स्थिर राहण्यासाठी आवश्यक आहे.या आणि अशा अनेक विषयांवर देखील त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन करून त्यांचे समाधान केले. 

अध्यक्षीय समारोपात प्रा.मोहम्मद इस्माईल यांनी नियोजनाबरोबरच मेहनत केल्याशिवाय यशाचे फळ मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने सखोल अभ्यास करावा आणि प्रशासकीय अधिकारी होऊन देशाची सेवा करावी असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शेख नजीर यांनी केले तर आभार प्रा.मारुती भोसले यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.बाबासाहेब भूकतरे,प्रा. सय्यद सलमान,प्रा.शिवकुमार भांडवलकर,प्रा.मोहम्मद रिजवान,प्रा.मो.दानिश,प्रा. अब्दुल अहद,प्रा.निजाम, प्रा.शबनम, प्रा.समिना खान, प्रा.ईब्तेसाम, प्रा.सनोबर आफ्रिन, अक्षय हासेवाड मोहम्मद मोसिन रब्बानी सर  गौस खान आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी