राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार रहावे -- हरिहरहराव भोसीकर -NNL


लोहा।
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा वाढण्यासाठी नियोजन केले जात असून सर्वच कार्यकर्त्यांनी गटातटाचे राजकारण व मतभेद विसरावे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांच्या विचारातील महाराष्ट्र  घडवायचा आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंडा फडकविण्यासाठीं सर्वांनी एकजुटीने पक्षाचे काम करण्याची गरज आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष हरिहरहराव भोसीकर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोहा- कंधार तालुक्याची कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली .जिल्हाध्यक्ष हरिहरहराव भोसीकर, शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता पवार,जिल्हा सरचिटणीस डी.बी जांभरुनकर , महिला जिल्हाध्यक्षा अंजलीताई रावणगावकर, लोहा तालुकाध्यक्ष माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे, ,किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मनोहर पाटील भोसीकर, कंधार तालुकाध्यक्ष शिवदास धर्मापुरीकर  ओबीसी प्रदेश सचिव अॅड अंगत केंद्रे ,रायुकाँ जिल्हाध्यक्ष संभाजी मुकनर  रेखाताई राहिरे ,युवती अध्यक्षा प्रियंकाताई कैवारे , जिल्हाउपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड , डॉ उत्तम सोनकांबळे ,

विधानसभा कार्याध्यक्ष दत्ता कारामुंगे ,विश्वाबर भोसीकर ,खविसं संचालक  दिगांबर सोनवळे ,बाबुराव देवकत्ते ,जिल्हा सचिव  , विलास घोरबांड ,माधव शिर्शीकर ,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष महमंद तन्वीरोदीन,  रायुकॉ  तालुकाध्यक्ष माधव कदम  ,त्र्यंबक पाटील भोसीकर,, कृउबा संचालक राजकुमार केकाटे, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष  हरिहरराव भोसीकर म्हणाले की माझे व माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचे कोणतेही मतभेद नाहीत , शंकर अण्णा धोंडगे हे नेते असून त्यांच्या सोबत राहून व त्यांच्या विश्वासात राघेऊन  कंधार लोहा तालुक्यातील आगामी  स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे नियोजन आहे. 

शंका कुशंका न घेता  आढावा बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी  पक्षाची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करावी असे आवाहन त्यांनी केले . माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार कोणताही असो त्यांना निवडून येण्यासाठी मी नेहमी प्रयत्न केला असून पुढेही भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे सांगत विद्यमान आमदारांनी मतदारसंघाचे कशाप्रकारे वाटोळे केले यांचा उल्लेख अनेक किस्से सांगून या ठिकाणी केला .या बैठकीचे  राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते तथा पानभोसी उपसरपंच शिवकुमार हरिहर भोसीकर उत्तम  नियोजन केले होते सूत्रसंचालन अँड अंगद केंद्रे यांनी तर आभार माधव कदम यांनी मानले .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी