राडा चित्रपटातील कलाकाराचा जवाहरलाल नेहरू समाज कार्य विघालयाचा वतीने सत्कार -NNL


नवीन नांदेड।
आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू आर.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नवीन नांदेड येथे राडा या मराठी चित्रपटातील भूमिका केलेले कलावंत व अभिनेते यांचा महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. 

राडा या  मराठी चित्रपटात महाविद्यालयाचा एम. एस. डब्ल्यू चा विद्यार्थी अजय राठोड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे.म्हणून नांदेड येथील चित्रपटात काम केलेल्या पाच कलावंत व अभिनेते यांच्या सत्कार संस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ.निरंजनकौर सरदार यांच्या हस्ते करण्यात आला ,याप्रसंगी या चित्रपटात सेकंड लीड ॲक्टर म्हणून महाविद्यालयाचा एम.एस.डब्ल्यू चा विद्यार्थी अजय राठोड यांनी भूमिका केली आहे. तसेच कॉमेडियनची भूमिका लक्षू देशमुख, नेगेटिव्ह कॅरेक्टर ची भूमिका रवी जाधव, सहाय्यक अभिनेता सतीश कासेवार आणि सोशल मीडिया लीड सागर पतंगे यांनी या चित्रपटात केलेली आहे राडाची चित्रपटाचे निर्माते राम शेट्टी व दिग्दर्शक नितेश नरवाडे हे आहेत नांदेडच्या भूमीत जन्मलेल्या कलावंतांनी नांदेडच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.  

महाविद्यालयात याप्रसंगी पाचही कलावंतांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. कलावंतांचे मार्गदर्शन ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.डॉ निरंजन कौर सरदार, प्रा.डॉ.नरहरी पाटील, प्रा. डॉ.अशोक वलेकर, प्रा.डॉ. मनीषा मांजरमकर, प्रा डॉ. रावसाहेब दोरवे, प्रा.डॉ .प्रतिभा लोखंडे, प्रा.डॉ.दिलीप काठोडे, प्रा.डॉ.विद्याधर रेड्डी, प्रा. डॉ. मेघराज कपूर,प्रा.डॉ.शिवाजी शिंदे, प्रा.डॉ.अंबादास कर्डिले, प्रा.डॉ.अशीफोदीन शेख, प्रा. गोपाल बडगिरे,प्रा.सौ.सत्वशीला वरगटे,प्रा.सुनील राठोड व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी