शालेय विद्यार्थ्याकडून जिल्हाधिकारी यांना पुलाच्या बांधकामासाठी निवेदन.. लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष -NNL


उस्माननगर, माणिक भिसे|
कंधार लोहा मतदार संघातील व उस्मान नगर येथून जवळच असलेल्या जोशी सांगवी ते तेलंगवाडी या रस्त्यावर जोशी सांगवी गावाजवळी नदीवरील पूल मागील अनेक वर्षापासून खचून तुटून गेल्यामुळे विद्यार्थ्यांची फार मोठी तारेवरची कसरत होत आहे.विद्यार्थ्यांना शाळेला येताना फार मोठी कसरत करावी लागत असल्याचे   नांदेडचे नूतन कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी  यांना निवेदनाव्दारे आमची होणारी कसरत थांबवून लवकरात लवकर पुल बांधून द्यावे अशी मागणी केली आहे .

कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील व उस्माननगर पासून जवळच असलेल्या मौजे तेलंगवाडी ते जोशी सांगवी हे गावे असून जोशीसांगवी येथील नागरिकांना व  मुलांना पुलाजवळून  जाताना  तारेवरची कसरत करावी लागत आहे.लोकप्रतिनि निवडणूकीत मोठ मोठ्या गप्पा मारुन मते मिळवून घेतात.व नंतर कामे करताना वेळ काढून पुढ जातात.जोशीसांगवी ते उस्माननगर ला कामानिमित्त येताना नागरिकांना तर शाळकरी मुलांना पुलाजवळून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. जोशीसांगवी गावाजवळील नदीवरील पूल मागील अनेक वर्षांपासून खचून,तूटून वाहून गेला आहे.पूल वाहून गेल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेला जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.


लोकप्रतिनिधि या पूलाची अनेक नेते मंडळीनी पाहीले,पण प्रत्येक्ष कामाला मनावर घेतले नसल्यामुळे नागरिक व विद्यार्थी यामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.या सर्व गोष्टींची परेशानी पाहून शाळेतील स्कुल बसचालक  चुडामण काळम,,माधव मोरे, विठ्ठल मोरे,माधव शिंदे, दत्ता हंबर्डे,उत्तम मोरे, विलास चल्लावार, मोहन मोरे आदी विद्यार्थी यांनी जिल्ह्याचे प्रशासकीय जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी यांच्याकडे पुलाच्या बांधकामासाठी मागणीव्दारे  निवेदन दिले आहे.या भागातील लोकप्रतिनिधी मुगगिळून गप्पा मारत बसले असल्याचे दिसून येते......

लवकरच जोशीसांगवी गावाजवळील नदीवरील पुलाचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी परदेशी यांनी विद्यार्थ्यांना दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी