पत्रकार सांवत यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटले, गळ्यातील सोन्याच्यी चैन पळवली -NNL


नविन नांदेड।
असरजन चौक ते हससापुर या रस्त्यावर निराळी पार्क समोर दुचाकी वरून आलेल्या दोघांनी सकाळी फिरायला निघालेल्या पत्रकार तुकाराम सांवत यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून गळ्यातील साडेतीन तोळयाची चैन पळवली असल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली असून या प्रकरणी ग्रामीण  पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

फिर्यादी पत्रकार तुकाराम सांवत रा.शंकरनगरी असरजन हे नेहमी प्रमाणे दैनंदिन दररोज सकाळी असरजन ते हससापुर या रस्त्यावर सकाळी फिरायला निघत असत,आज १७ सप्टेंबर रोजी सकाळी ते साडे सहा वाजता निराळी पार्क समोर रस्त्यावर आले असता अज्ञात मोटार सायकल वर आलेल्या दोन युवकांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत गळ्यातील सोन्याची चैन लुटल्या ची घटना घडली,प्रतिकार करत असतांनाच धारदार शस्त्राने बघ अशी धमकी दिली व मोटार सायकल वरून अज्ञात चोरटे पसार झाल्याचे सांगितले.

घटना घडल्यानंतर नंतर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तात्काळ उपनिरीक्षक आंंनद बिचेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली,तर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी ही परिसरातील संबंधित ठिकाणी भेट दिली असुन अज्ञात आरोपीच्या शोध घेण्याबाबत पोलीसांना सुचना दिल्या आहेत, या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून  कलम ३९२ ,३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेच्या अधिक तपास उपनिरीक्षक महेश कोरे हे करीत असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी