हदगाव तालुक्यातील स्वस्त धान्य वाटपातील 'गोंधळ ' बंद करा अन्यथा आदोंलन-अहेमद उमर चाऊस -NNL


हदगाव, शे चांदपाशा|
हदगाव तालुक्यात स्वस्त धान्य वाटपास गलथानपणा दिवसेंदिवस वाढत असुन या मध्ये सुधारणा न झाल्यास तहसिल कार्यालयवर भव्य मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा एआयएमआयएम तालुका अध्यक्ष अहेमद उमर चाऊस यांनी तहसिलदार द्वरे जिल्हाअधिकारी नादेड यांना निवेदन निवेदन पाठवून दिलेला आहे.

त्यांनी दि.1सप्टेबर 2022 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यात  स्वस्त धान्य मिळणाऱ्या लाभर्थीना १ते१० किमी दुरवरुन दुकाना भोवती चकरा मारव्या लागत आहे. तसेच तीन महीण्याचे धान्य राशन पुरवठा विभागाकडे बाकी असुन, ते धान्य पण त्वरीत तालुक्यात वाटप करण्यात यावे. दुसरी विशेष बाब अशी की धान्य स्वस्त दुकानात येते परंतु इपाँस मशीनला धान्य वाटपा बाबतीत सिग्नल देण्यात येत नाही. परिणाम स्वरुप स्वस्तधान्य दुकान मालक व लाभर्थी या मध्ये वाद वाढत आहे. 

आलेले धान्य सुरक्षित ठिकाणी जागेअभावी ठेवण्यात त्याना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे दुसरी गंभीर बाब म्हणजे तालुक्या तील काही स्वस्त धान्य दुकानदाराकडे मोजकेच राशन कार्ड जोडलेले आहे. तर काही धानड्य दुकानदाराकडे भरपुर रेशन कार्डची संख्या आहे. यामुळे शहरातील व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानावर प्रचंड प्रमाणात झुंबड असते. काही महीने समान लाभार्थी [रेशनकार्डधारक] सर्व स्वस्त दुकानांना जोडण्यात यावे अशी मागणी ही निवेदनात करण्यात आलेली आहे.

तसेच गाव निहाय समान लाभार्थी जोडावे लाभर्थ्याना धान्यची पावती देण्यात यावी. मागील बाकी राशन देण्यात यावे जर या मागण्याकडे दुर्लक्ष व आमच्या निवेदनातील मागण्याची दखल घेतली नाही. तर आम्हाला नाईलाजाने सनदी मार्गाने दि १६ सप्टेंबर 2022 रोजी आझाद चौक ते तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असा निवेदनात करण्यातुन देण्यात आला आहे. या निवेदनावर शे खाजा शे इसा आदीच्या सह्या आहेत.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी