राम - रहीम गणेश मंडळांच्या लावणी कार्यक्रमास मुखेडकरांचा उत्सुर्फ प्रतिसाद ...NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
मुखेड शहरातील राम रहीम गणेश मंडळाच्या वत्तीने दि.५ सप्टेंबर रोजी शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मुलांच्या मैदानावर आयोजित केलेल्या भव्य लावणी आणि लक्ष्मी म्युझिकल ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमात मुखेडकर उत्सुर्फ प्रतिसाद दिला या लावणी कार्यक्रमाचे उद्घाटन मुखेडचे लोकप्रिय आ.डॉ.तुषार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले .

या कार्यक्रमात लावणी सम्राज्ञी रुपाली पा.पुणेकर आणि शूष्मा गोरे बीडकर यांनी वाजले की बारा .. , चंद्रा..., बाई वाड्यावर या ..... , लावणीच्या ठुमक्यावर मुखेडकरांना मंत्रमुग्ध केले‌. कार्यक्रमाचे आयोजन राम - रहीम गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवा मुद्देवाड आणि सचिव तथा एकनाथ शिंदे गटाचे बजरंग कल्याणी यांनी केले होते. या कार्यक्रमास शहरांसह तालुक्यातील रसिक प्रेक्षक मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. रसिक प्रेक्षकांनी वन्समोर लावण्याची मागणी केल्यानी कलाकारांनी सुद्धा त्यास प्रतिसाद देत प्रेक्षकांच्या हाकेला साद दिली. 


या कार्यक्रमास मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. डॉ. तुषार राठोड, भाजपा नेते व्यंकटरावजी लोहबंदे , भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गजलवाड , मा.नगराध्यक्ष अनिल जाजू , शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे , माजी नगरसेवक चंद्रकांत गरुडकर , माजी नगरसेवक नासरखान पठाण , राजू घोडके , माजी नगरसेवक दीपक मुक्कावार , भाजप शहराध्यक्ष किशोर चव्हाण , संजय वाघमारे, शिवकुमार बंडे , राजू रनभीडकर , संदिप काळे , माधव देवकते , संतोष घाळेवाड , शंकर पिटलेवाड , गजानन लोखंडे , अमजत पठाण , पवन मिंपुलवाड, रवी मुद्देवाड यांच्यासह आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी