यवतमाळच्या पोलीस मुख्यालयाच्या गेटवर पोलिस कर्मचाऱ्याचा खून -NNL

यवतमाळ| जुन्या वादाच्या कारणातून मारेकऱ्याने चक्क यवतमाळ येथील पोलिस मुख्यालयात जाऊन पोलिस कर्मचाऱ्याचा खून केला आहे. निशांत खडसे, असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, घटनेचा तपस सुरु आहे.

यवतमाळच्या पोलीस मुख्यालयात निशांत खडसे हा मृत पोलिस कर्मचारी कामानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आले होते. यावेळी काही अनोळखी मारेकरी अचानक पोलिस मुख्यालय गेट जवळ आले आणि त्यांनी काही कळण्याअगोदर निशांत खडसे यांचा खून केला. घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला केला.  अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी