मुख्याध्यापिका सौ. अनुराधा पवार यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न नागरी पुरस्कार प्रदान -NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
पेठवडज येथील परफेक्ट प्रायमरी इंग्लिश स्कूल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा पवार( हिवराळे )याना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय शिक्षक रत्न नागरी पुरस्कार देऊन नांदेड येथे एका कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .

 महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतास त्यांचा सन्मान म्हणून संघटनेच्या वतीने पुरस्कार दिला जातो.  पेठवडज ता.लोहा येथील परफेक्ट प्रायमरी इंग्लिश स्कूल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनराधा पवार ( हिवराळे ) यांच्या  शाक्षणिक कार्याची व शिक्षणाविषयी असलेल्या तळमळीची दखल घेऊन सदरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शिक्षक रत्न नागरी पुरस्कार समारंभ  नांदेड येथील कुसुम सभागृहात नुकताच माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या  हस्ते पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले . त्यांच्या या गौरव व पुरस्काराबद्दल कंधार पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी पेठवडज येथील परफेक्ट प्रायमरी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष गिरीधारी केंद्रे सचिव गोविंद केंद्रे शाळेतील शिक्षक वृंदावन पेठवडज येथील पालक विद्यार्थी यांनी त्यांना त्यांच्या या पुरस्काराबद्दल अभिनंदन चा वर्षा होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी