हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘नवरात्रीत लव जिहाद ?’ या विषयावरील ऑनलाईन विशेष संवाद -NNL

‘लव जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको !


मुंबई|
जे हिंदु धर्मातील रूढी, परंपरा आणि देवीदेवता यांना मानत नाहीत, उलट आमच्या देवीदेवतांना घृणास्पद नजरेने पाहतात. त्यांचे मौलाना नवरात्रीत मुसलमानांना प्रवेश हवा, याच्या बाता करतात. नवरात्रीत गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको; कारण नवरात्रीत गरबा उत्सवात हिंदु मुलींना फूस लावून ‘लव जिहाद’च्या अनेक घटना भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर घडल्या आहेत. 

वर्ष 1995 पासून यु.के.मधील ब्रैडफोर्ड (लीड्स) येथे हिंदू मुलींना फूस लावून ‘लव जिहाद’च्या जाळ्यात ओण्यासाठी ‘इस्लामिक हिट टीम्स’ कार्यरत होत्या. केरळ उच्च न्यायालयानेही ‘लव जिहाद’ अस्तित्वात असल्याचे स्पष्ट केले आहे. लव जिहाद रोखण्यासाठी कायदा हवा, अशी मागणी ‘संगम टॉक्स’च्या संपादिका तान्या यांनी केली. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘नवरात्रीत लव जिहाद ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.

सिंह वाहिनीच्या संस्थापिका पुष्पा पाल ‘लव जिहाद’ विषयी आपले अनुभवकथन करताना म्हणाल्या की, जे म्हणतात ‘लव जिहाद’ नाही, त्यांना मी सांगते की, ‘लव जिहाद’ला मी स्वतः बळी पडली होते. हा एक ‘जिहाद’ आहे, हे पटकन लक्षात येत नाही. ‘लव जिहाद’ हा प्रेमासाठी नसून मुसलमानांची लोकसंख्या वाढवणे आणि हिंदु युवतींचे धर्मांतर करणे, यासाठीच योजनाबद्ध पद्धतीने केला जातो. त्यामुळे हिंदु युवती, महिला यांनी धर्मशिक्षण घेऊन आता सजग राहणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर म्हणाल्या की, नवरात्रीत विविध ठिकाणी गरबा खेळण्याचे निमित्त करुन अनेक मुसलमान युवक गरब्यात सहभागी होतात आणि यात सहभागी हिंदु युवतींना आपल्या प्रेमाच्या जाळयात फसवतात. मग त्या ‘लव जिहाद’ची शिकार होतात. गेल्या काही महिन्यात 14 ते 18 या वयोगटातील अल्पवयीन मुली ‘लव जिहाद’ला बळी पडल्या आहेत, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ‘लव जिहाद’विषयी हिंदु जनजागृती समिती गेली अनेक वर्षे जागृती करत आहे. समितीने याविषयी ग्रंथही प्रकाशित केला आहे. व्याख्याने आणि विविध उपक्रमांतून ‘लव जिहाद’च्या समस्येला वाचा फोडून याविषयी सतर्क राहण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समिती करत असते.

श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.(संपर्क : 99879 66666)


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी