नांदेड जिल्ह्यातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांविषयी माहिती देणारी कॉफी टेबल बुकचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार प्रकाशन -NNL


नांदेड|
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने नांदेड जिल्ह्यातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांविषयी माहिती देणारी कॉफी टेबल बुक तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या फोल्डरचे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात येणार आहे तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या औचित्याने जिल्हाभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचे कॅलेंडर तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन सामान्य प्रशासन, कृषी, महिला व बालकल्याण आदी विभागाने आपापल्या विभागाची माहिती यावेळी सांगितली. 


सद्यस्थितीत लम्पी स्कीन डिसेसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत असून त्यासाठी 84 पशुवैद्यकीय संस्था, 16 शीघ्रकृती दल स्थापन करण्यात आला आहेत. जिल्हा परिषदेमार्फत गोट फ्रॉक्सची खरेदी करून पन्नास हजार लस्सी वितरित केले आहेत. जनावरांना ताप येणे, खाणे बंद करणे, नाका तोंडातून चिकट द्रावने त्वचेवर गाठी येणे अशा बाबी आढळल्यास तात्काळ 1962 टोल फ्री नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या वतीने चालू असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे यशोगाथ, आरोग्य विभागाच्या वतीने पोषण आहार विषयक पुस्तिका, जलजीवन मिशन अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी बाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने आज जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक विभागाचे प्रशांत दिग्रसकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, जिल्हा कृषी अधिकारी  चिमनशेट्टे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी